healthplanet.net

Posted on

घसा बसल्यास करावेत हे घरगुती उपाय

आलं आणि मध :
आल्याला आयुर्वेदात फारचं महत्व आहे. आलं ही एक प्रभावी औषधी वनस्पती आहे. घसा जर बसला असेल तर आल्याचा छोटा तुकडा मधासोबत चावून खावा. यामुळे घशातील कफ, सुज, इन्फेक्शन कमी होते व घशाला आराम मिळतो, तसेच आवाजही मोकळा होतो. दिवसातुन दोन ते तीनवेळा आलं व मध खावे, याने आपला त्रास नक्कीच कमी होईल आणि आराम मिळेन.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या :
घसा जर बसला असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. त्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात थोडेसे मीठ घालावे आणि त्या पाण्याणे गुळण्या कराव्यात यामुळे घशाला आलेली सुज कमी होण्यास मदत मिळते तसेच काही इन्फेकशन किंवा व्हाईरल इन्फेकशन असेल तर ते देखील कमी होते आणि त्याचसोबत आवाज/ गळा बसणे कमी होते.

मध आणि लवंग:
लवंगाची पावडर करून मधासोबत त्याचे चाटणं बनवून घ्यावे. हे चाटणं घेत राहिल्याने घशाला आराम मिळतो व आपला आवाज मोकळा होण्यास सुरवात होते. लवंग ही देखील यावर रामबाण उपाय म्हणून काम करते.

लिंबू पाणी
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावे यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते. तसेच कोमट पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याच्या गुळण्या केल्याने ही घशाला आराम मिळतो व घसा बसणे कमी होते.

मध
मध हे एक नैसर्गिक अ‍ॅन्टिबायोटिक गुणधर्म असणारे आहे त्यामुळे मध हे देखील अनेक आजारा वर गुणकारी आहे ,त्यामुळे कोमट पाण्यात मध मिसळून घेतल्याने घशातील सुज व इन्फेक्शन कमी होते आणि आपला गळा बसणे घसा बसणे पुर्ण पणे कमी होते. रोज सकाळ संध्याकाळ मध कोमट पाण्यात मिसळून प्यावे त्याने बराच आराम मिळेल.

लसुण
घसा जर बसला असेल तर एक ते दोन लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावुन खाव्यात. लसूण हा गरम असून त्याचा अतिशय उग्र वास असतो त्यामुळे घशातील कोणतेही इन्फेकशन आणि इतर समस्या राहत नाही आणि यामुळे घसा बसणे कमी होते.

ओवा
ओवा पाणी दोन ग्लास पाण्या मध्ये दोन चमचे ओवा घालुन ते पाणी मंद आचेवर उकळुन घ्यावे. थोड्या वेळाने पाणी कोमट झाल्या नंतर त्यात मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे घशाची सुज कमी होवुन आवाज ही मोकळा होण्यास मदत होते आणि घसा व गळा यांच्या समस्या नाहीशा होतात. लसूण या प्रमाणेच ओवा देखील या त्रासावर अनुकूल परिणाम करणारा आहे.

हळदीचे दूधहळदीचे दूध
हळद आणि गरम दूध हे अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून ओळखले जाते. गरम दुधात हळद घालुन प्यायल्याने देखील आपल्या घशा तील इन्फेक्शन कमी होते व घशाला बर्‍यापैकी आराम मिळतो. हळदी बरोबर सुंठ पूड ही देखील दूधात घालु शकता. आधीच्या काळापासूनच जास्त खोकला किंवा सर्दी ताप अथवा इन्फेकशन असेल तर हा उपाय करत असत

कांदा रस
कांद्याचे खाण्याशिवाय ही औषधी उपयोग आहेत. कांद्याच्या रसामुळे कफ पातळ होतो तसेच घसा मोकळा होतो. दिवसातुन दोन ते तीन वेळा कांद्याचा रस किंवा त्याचे चाटणं बनवुन त्याचे सेवन करावे. याने घसा बसणे गळा बसणे या समस्या नाहीश्या होतात.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info