Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
दुसरी तिमाही
दुसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) ते ६ महिने (२८ आठवडे) हा काळ मानला जातो.
या काळात वजन वाढण्यास सुरुवात होते. गर्भधारणा असलेले १२ आठवड्याचे गर्भाशय ओटीच्यावर हाताला जाणवते. बाळाची वाढ सुरू राहते. २० आठवडे पूर्ण होताना मातेस गर्भाची हालचाल जाणवू लागते. गर्भातील बाळाची इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. गर्भ मूत्रविसर्जन करते. हे गर्भजलाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. याकाळात जननेंद्रिय तयार होते आणि हे भ्रूण स्त्री-पुरुष म्हणून ओळखले जाऊ शकते.
गर्भावस्थेची दुसरी तिमाही १३ ते २७ आठवड्यांची असते. या कालावधीमध्ये गर्भाची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आणि स्नायूंचे चलनवलन चालू होते. गर्भाच्या मेंदूची वाढ हा या टप्प्यामधील महत्त्वाचा घटक आहे.
१४-१६ आठवडे पूर्ण होताना स्तनांमध्ये पिवळसर चिकट द्रव तयार होणे सुरू होते. गर्भाशयाला ब्रॅस्टन-हिक्स आकुंचन (Braxton Hicks contractions) सुरू होतात. या गर्भारपणात गर्भाशयाच्या स्नायूंची हालचाल करून त्यातील ताण व्यवस्थित करण्याबरोबर गर्भाला उत्तेजित करत असतात. याद्वारे भ्रूणातील रक्तसंक्रमण व्यवस्थित केले जाते.
गर्भधारणा: ६वा महिना
तुमचे बाळ तुम्हाला ऐकू शकते, त्याच्यासाठी गाणे म्हणा!
तुमच्या गर्भाशयात आता बाळ नियमित मध्यंतराने उठते व झोपते. ते आता डोळे उघडू शकते व बंद करु शकते, व त्याची बोटे किंवा अंगठा चोखू शकते! यामुळे चोखण्यासाठी आवश्यक असलेले त्याचे स्नायू विकसित होतात म्हणजे जन्मतःच दूध पिण्यासाठी ते पुरेसे सशक्त असते. आता त्याच्या मेंदूची वाढ होत आहे व तो वेगाने विकसित होत आहे.
आता ते आवाजाला प्रतिसाद देऊ शकते. सुरुवातीला त्याला केवळ तुमच्या छातीच्या ठोक्यांसारखे, तुमच्या शरीरातले आवाज ऐकू येतात. मात्र हळूहळू त्याला तुमच्या शरीराच्या बाहेरचेही आवाज ऐकू येतात. तुमच्या बाळासाठी गाणे म्हणा म्हणजे त्याला तुमचा आवाज ऐकू येईल.
तुमचा गर्भाशय तुमच्या छातीच्या पिंजऱ्यापर्यंत आल्यासारखे वाटेल, ज्यामुळे तुम्हाला कदाचित गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या बाळाचा आकार वाढत असल्याने पोट आक्रसू शकेल त्यामुळे खाणे अवघड होऊ शकते. अधिक वेळा थोडे थोडे खा व जेवणादरम्यान अल्पोपहार घ्या.
तुमचे बाळ वाढते तसा तुमच्या पोटाचा आकारही वाढतो. तुमच्या पोटावरील त्वचा ताणली जाते व त्यामुळे खाज उठू शकते. तुमचे पोट, नितंब, खालचा भाग व स्तनांवर लाल चट्टे दिसू शकतील. त्या त्वचा ताणल्याच्या खुणा आहेत व तुम्ही बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाहीशा होतील. तुम्हाला पायात पेटके येऊ शकतात किंवा शिरांवर सूज येऊ शकते.
| --------------------------- | --------------------------- |