healthplanet.net

Posted on

अपेंडिक्स झालं तर काय?
लहान आतडे संपून मोठे आतडे सुरू होते तिथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरवातीला असतो. त्यालाच अपेंडिक्‍स म्हणतात. माणसाची पूर्ण वाढ झाल्यावर अपेंडिक्‍सची वाढ होत नाही. अपेंडिक्‍सला सूज येणे यालाच अपेंडिसायटीस असं म्हणतात. या विकाराचा त्रास न होण्याकरिता काही काळजी घेऊनही हा आजार टाळता येत नाही. औषधोपचारांनी ही सूज कमी होऊ शकते.
लहान आतडे संपून मोठे आतडे सुरू होते तिथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरवातीला असतो. त्यालाच अपेंडिक्‍स म्हणतात. माणसाची पूर्ण वाढ झाल्यावर अपेंडिक्‍सची वाढ होत नाही. अपेंडिक्‍सला सूज येणे यालाच अपेंडिसायटीस असं म्हणतात. या विकाराचा त्रास न होण्याकरिता काही काळजी घेऊनही हा आजार टाळता येत नाही. औषधोपचारांनी ही सूज कमी होऊ शकते. लक्षणं
भूक न लागणं, कधीतरी पोटात दुखणं, पचनक्रिया नीट न होणं, यालाच अपेंडिक्‍समुळे होणारं अपचन म्हणतात.
पोटदुखीला सुरवात होते. बेंबीच्या भोवती, पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला पोट दुखायला लागतं. पोटदुखीनंतर बारीक ताप यायला सुरवात होते. १८ ते २४ तासांत हा ताप वाढतो. काही रुग्णांमध्ये या तापाची लक्षणं दिसून येत नाहीत. उलट्या-पित्त-मळमळ अशा स्वरुपामध्ये त्रास सुरु होतो. न पचलेलं पाणी, अन्न आणि नंतर पित्त अशी तीव्रता वाढत जाते. शौचास न होणं, पोट फुगणं असा त्रास सुरु होतो .डोके दुखणं, ताप, उलट्या या लक्षणांना मर्फिज सिन्ड्रोम म्हणतात. खालील शक्यता डॅाक्टर लक्षात घेतात.
-शरीरात पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं असतं.
-लघवीत जंतूसंसर्ग किंवा रक्ताच्या पेशी वाढतात.
- उजव्या मूत्रनलिकेतील मूतखडा, उजव्या बाजूच्या आतड्यांचा दाह
-पोटातील लिफनोडस् ना सूज, उजव्या बाजूतील गर्भनलिकेत गर्भधारणा
उपचारामध्ये काही वेळा तात्पुरता औषधोपचार केला जातो. यात प्रतिजैविके, सूज व वेदना कमी होणारी औषधे, शिरेतून सलाईन दिलं जातं.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info