Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता '8' घरगुती उपाय
मासिकपाळी पुढे-मागे करण्यासाठी गोळ्या घेणे टाळा आणि हे नैसर्गिक उपाय करा...
भारतात पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याने ' स्त्री व मासिक पाळी' याविषयी अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळी दरम्यान स्त्री ही 'विटाळ' समजली जाते. आजच्या 21व्या शतकातही तिला मासिक पाळीदरम्यान सार्वजनिक कार्यक्रम , पुजा- अर्चा , लग्नविधी तसेच स्वयंपाकघरापासून दुर ठेवले जाते. त्यामुळे अनेकदा स्त्रीयांना सार्वजनिक व धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांची मासिक पाळी मागे किंवा पुढे करणे भाग पडते . मग यासाठी औषधांबरोबरच हे काही घरगुती उपचार देखील करून पहा. मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यापूर्वी त्याबाबत या 10 गोष्टी नक्की जाणून घ्या तसेच त्या घेण्याबाबतच एक्सपर्ट सल्लादेखील !
मासिक पाळी म्हणजे काय?
मुलगी वयात आल्यावर दर महिन्याला योनीमार्गातून अंदाजे ३ ते ५ दिवस रक्त वाहते. या शारीरिक क्रियेला 'मासिक पाळी' असे म्हणतात. स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्र बीजाशी संयोग न झाल्याने ते निरुपयोगी बीज शरीरातून बाहेर फेकले जाते. मासिक पाळीचे हे चक्र २८ ते ३५ दिवसांचे असते. जाणून घ्या मासिकपाळी दरम्यान ‘सेक्स’करावा का ?
पहा कोणते अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमची मासिक पाळी तुम्हाला हवी असलेल्या दिवशी आणू शकता -
1) पपई -
पपई हे गरम प्रकृतीचे फळ असल्याने ,त्याच्या सेवनाने शरिरात उष्णता तयार होऊन तुम्हाला वेळेच्या आधी मासिक पाळी येण्यास मदत करते. पपईतील 'कॅरोटीन' स्त्री शरीरातील 'इस्ट्रोजन' नामक हार्मोन्स उत्तेजित करते त्यामुळे तुमची मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. जाणून घ्या पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे !
2) गूळ -
भारतीय स्वयंपाक घरात अगदी सहजतेने गूळाचा वापर केला जातो. आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते. ग़ुळाच्या सेवनानेदेखील मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.
तुम्ही गूळ तिळाच्या बियांसोबत घेऊ शकता. किंवा सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर आल्याच्या रसात गुळ घालून घेतल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.‘गूळ’ खाल्ल्याने मासिकपाळीपूर्वी होणारी चिडचिड कमी करण्यास मदत होते.
3) डाळिंब -
मासिक पाळी लवकर आणण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीपासुनच तुम्ही डाळिंबाचे सेवन सुरु करावे. डाळिंबाचा रस दिवसातुन तीनदा घ्या . अथवा डाळिंब व उसाचा रस यांचे मिश्रण दिवसातून चार वेळेस घ्या. म्हणजे तुमची मासिक पाळी लवकर येण्यास मदत होईल. शरिरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास कसे उपयुक्त आहे डाळिंब हे देखील जरूर वाचा.
4) गाजर -
मुबलक प्रमाणात 'कॅरोटीन' असलेली फळं व भाज्या , उदा. गाजर , भोपळा यांचा आहारात पुरेसा वापर ठेवा. दिवसातून किमान २-३ वेळेस गाजराचा रस प्या. गाजरातील 'कॅरोटीन' शरिरातील 'इस्ट्रोजन'ना चालना देतात परिणामी मासिक पाळी लवकर येते.
5) तीळाच्या बिया -
तुम्हाला अपेक्षित असलेल्या तारखेच्या १५ दिवस आधीपासुन चमचभर तीळ व गूळ घ्या. अथवा पाळी लवकर येण्यासाठी गरम पाण्यासोबत चमचाभर तीळ नियमित दिवसातून दोनदा घ्यावेत. तीळाचे तेल या '7' प्रकारे खुलवेल त्वचेचे आरोग्य !
6) ओवा -
मेथी व ओवा यांच्या सेवनाने देखील तुम्हाला मासिक पाळी लवकर येण्यास मदत होईल. मेथी व ओव्याचे दाणे पाण्यात टाकून त्याचा ग्लासभर अर्क घेतल्यास लवकर पाळी येण्यास मदत होईल. तसेच ओव्याचे पाणी झटपट दूर करेल या ‘५’ समस्या !
7) अननस -
शरिरातील उष्ण्ता वाढवण्यासाठी अननस फारच उपयुक्त फळ आहे. मुबलक प्रमाणात अननस खाल्ल्याने तुम्हाला तुमची मासिक पाळी लवकर येण्यास नक्कीच मदत करू शकेल. अननसाने ठेवा कोलेस्ट्रेरॉलवर नियंत्रण !
8) हळद-
चिमूटभर हळद उकळत्या पाण्यात टाकून ते पाणी तुम्हाला अपेक्षित असलेल्या तारखेच्या पंधरा दिवस आधी घेतल्यास , अंदाजे ५ दिवस आधी मासिक पाळी येण्यास मदत होईल. हळदीचे दूध प्या आणि या ’7′ समस्यांना दूर ठेवा.
| --------------------------- | --------------------------- |