healthplanet.net

Posted on

थंडी-ताप, कमी-जास्त प्रमाणात येणारा ताप, विशिष्ट वेळेत येणारा ताप, मुरलेला ताप.. तापाचे असे विशिष्ट प्रकार. सध्याच्या वातावरणात ताप येण्याचे प्रमाण खूप आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ताप हा विकार नसून, ते एखाद्या विकाराचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास जिवावरही बेतू शकते.

ताप म्हणजे नेमके काय?

शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेले की ताप येतो. तापाची व्याख्या आपण शारीरिक तापमान नियंत्रित ठेवणे अशी करू शकतो. खरे म्हणजे ताप येणे हे चांगले लक्षण आहे. ताप येणे म्हणजे प्रतिकारशक्ती येणे. मात्र ३७ अंश सेल्सिअस या शारीरिक तापमानाच्या मर्यादेपलीकडे तापमान गेल्यास ताप येतो.

तापाचे विविध प्रकार

ताप किती आहे, यापेक्षा तो कोणत्या कारणामुळे आला आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अनेकदा १००अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास आपण खूप ताप आहे, असे संबोधतो. मात्र तापाचे नेमके कारण काय याचे निदान होणे आवश्यक आहे. त्यानुसारच पुढील उपचार करता येतील.

उपचार

विश्रांती घेणे : बऱ्याचदा ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि विश्रांती घेतली जात नाही. तापामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे कामाचा ताण न घेता पूर्ण दिवसभर विश्रांती घेणे आवश्यक आहे. झोपेमुळे शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होते.

आहार : तापामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घ्यावा. बहुधा द्रव पदार्थ घेणे आवश्यक आहे. भरपूर पाणी व फळांचा रस घ्या, ज्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही. हलके अन्न घ्यावे, जे पचण्यास सोपे असते.

औषधे : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट औषधे घ्यावीत. विशेष म्हणजे स्वमर्जीने औषधे घेऊ नये. अनेकदा ताप आल्यास औषधांच्या दुकानातून तापावरील गोळी आणून ती घेतली जाते. मात्र ताप कोणत्या प्रकारचा आहे, हे माहीत नसल्याने अशा प्रकारची औषधे स्वमर्जीने घेऊ नका. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

वातावरण थंड : ताप आल्यास उष्णतेवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील वातावरण थंड ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पंखा, एसी लावला तरी चालेल. मात्र थंडी वाजत असल्यास हा उपाय करू नये.

घरगुती उपचार : ताप आल्यास अनेकदा कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्टय़ा ठेवल्या जातात. मात्र तापमान नियंत्रित ठेवायचे असल्यास संपूर्ण अंग थंड पाण्याने पुसून काढणे आवश्यक आहे.

कपडे : ताप आल्यास पातळ व तलम कपडे घालावेत.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info