गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम?healthplanet.net

Posted on Fri 28th Feb 2020 : 17:55

गर्भनिरोधक गोळ्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम
No-Author | महाराष्ट्र टाइम्सUpdated: 3 Oct 2019, 9:22 am
165
Subscribe
​गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरी सल्ल्यावाचून गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर केला जातो. गर्भनिरोधक गोळी वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे हे हानिकारक ठरू शकते.

गर्भनिरोधक गोळ्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम
गर्भनिरोधक गोळ्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम
डॉ गंधाली देवरुखकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

Adv: होम शॉपिंगचा शेवटचा दिवस - घरातील आणि किचनमधील वस्तूंवर मिळवा ७० टक्क्यांपर्यंत सूट

गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरी सल्ल्यावाचून गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर केला जातो. गर्भनिरोधक गोळी वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे हे हानिकारक ठरू शकते. त्याचे बरेच दुष्परिणाम शरीरावर होतात. या दुष्परिणामांबद्दल बऱ्याच महिलांना माहिती
नसते.


गर्भनिरोधक गोळ्यांना मॉर्निंग पिल्स असेही म्हणतात. या गोळ्यांमध्ये लेव्होनोरजेस्ट्रेल हे प्रोजेस्टरॉन असते. संततीनियमनाच्या साधनाचा उपयोग न झाल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी लवकरात लवकर किंवा ७२ तासांच्या आत घेण्यात यावी. ही गोळी गर्भधारणा केली असल्यास घ्यावी आणि महिन्यातून एकदाच घेतली जावी. पण आजकाल महिला या गोळ्या महिन्यातून अनेकदा घेतात. या गोळीचे परिणाम आणि दुष्परिणाम यांची त्यांना काहीच कल्पना नसते. या गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी योग्य प्रकारे समुपदेशन होणे आवश्यक आहे.

गोळ्यांचे दुष्परिणाम
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे नको असलेली गर्भधारणा रोखता येत असली, तरी या गोळ्यांमुळे शरीरात संप्रेरकीय बदल घडून येतात आणि बहुतांश स्त्रियांना या गोळ्यांच्या विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. प्रत्येक महिलेची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कोणत्या गर्भनिरोधक गोळ्याचे दुष्परिणाम कशा प्रकारे होतील, यात फरक असतो.

या गोळ्यांमुळे अनियमित रक्तस्राव, अनियमित पाळी, मळमळ, उलट्या, स्तनांना सूज येणे, शरीर सुजणे, वजन वाढणे, स्वभावात तीव्र चढउतार होणे इत्यादी परिणाम होतात. त्याचप्रमाणे या गोळ्यांमुळे लैंगिक संक्रमित आजारांपासून संरक्षण होत नाही.


नियमित घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या घातकच
नको असलेले गर्भारपण टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या नियमित घेणाऱ्या स्त्रियांची संख्या अधिक आहे. या गोळ्या सुरक्षित आहेत, यावर त्यांचा विश्वास असतो. इतर कुणाच्या अनुभवावरून किंवा जाहिरातींना भुलून सेवन करण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. मात्र हे कधी कधी जीवावर बेतू शकते. ज्या स्त्रियांना यकृताचे आजार, मायग्रेनची समस्या असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, मधुमेहाचा त्रास किंवा इतर कोणत्याही आजारपणाचे औषध सुरू असेल, तर त्यांनी नियमित स्वरूपामध्ये या गोळ्या घेणे, हे जिवावर बेतू शकते.

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info