healthplanet.net

Posted on

हृदयाला चार कप्पे (वर दोन कणिर्का-Auricles व खाली दोन जवनिका-Ventricles) असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो.

हृदय त्याकडे आलेले रक्त आत घेत व बाहेर टाकते. हृदयाकडे रक्त आणले जाते व हृदय ते बाहेर फेकते. हृदयाला चार कप्पे (वर दोन कणिर्का-Auricles व खाली दोन जवनिका-Ventricles) असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाउन प्राणवायू शोषला जातो. हे रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते. आणि तेथून ते डाव्या जवनिकेतुन शरीरभर पोहोचवले जाते. विविध शरीराची कामे करण्यासाठी प्राणवायू, साखर व इतर मूलद्रव्ये ही रक्तामार्फत शरीरभर नेली जातात. शरीर लागेल त्याप्रमाणे ऑक्सिजन व इतर पौष्टिक पदार्थ घेते व परत अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहचवते. रक्त जेव्हा धमन्यातून वाहते तेव्हा धमन्यांचा त्याच्यावर दाब पडतो त्याला रक्तदाब असे म्हणतात.


कप्पे व रक्तप्रवाहाचे मार्ग

हृदयाला काम करण्यासाठी त्यातील काम करणाऱ्या स्नायूंना शर्करा व प्राणवायू या मूलभूत ऊर्जा निर्माण करणाऱ्या घटकांचा सतत पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते. शर्करा आणि प्राणवायू हे रक्तातूनच मिळतात आणि ते रक्तवाहिन्यांद्वारे हृदयाच्या सर्व भागांत पोहोचविले जातात. हृदयाच्या स्नायुंना प्रसरन काळात रक्तपुरवठा होत असतो. हृदयाला सतत स्पंदन निर्माण करणाऱ्या एका विद्युतस्त्रोताची आवश्यकता असते. हा विद्युतस्त्रोत कर्णिकेच्या पेशीभित्तीमध्ये असतो. विद्युत स्पंदन हे हृदयाच्या कर्णिकेत तयार होऊन सर्व हृदयभर पसरविले जाते. त्यामुळे हृदयाच्या आकुंचन पावण्याची क्रिया होऊन हृदयाचा पंप काम करू लागतो. त्यासाठी सतत असा विद्युतस्त्रोत आवश्यक असतो. मानवीहृदय मिनिटाला सरासरी ७२ वेळा आकुंचन प्रसरण पावते.


कप्पे व कार्य :

उजवी कर्णिका
डावी कर्णिका
उजवी जवनिका
डावी जवनिका

हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात:
२ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक)
२ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.


कर्णिकांमध्ये धमन्यांमार्फत आणलेले रक्त जाते. कर्णिका व जवनिकांमध्ये झडपा असतात. प्रथम कर्णिका आकुंचन पावतात. त्यामुळे झडपा उघडून रक्त कर्णिकेतून जवनिकेत येते.
आता रक्त जवनिकेत मध्ये आल्यावर कर्णिका प्रसरण पावते व जवनिका आकुंचन पावते. त्याच वेळा झडपा बंद होवून रक्त परत मागे फेकले जात नाही व एकाच वेळेला फुफ्फुसाकडे आणि शरीराकडे रक्त पोहोचवले जाते.
यामधले डाव्या बाजूचे दोन कप्पे फुफ्फुसाकडुन ऑक्सिजन घेऊन आलेले रक्त हाताळतात. तर उजव्या बाजूचे दोन कप्पे शरीराला ऑक्सिजन पुरवून आलेले व फुफ्फुसाकडे नेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड सोबत आणलेले रक्त सांभाळतात.

या प्रक्रियेत बिघाड झाल्यावर हृदयविकाराला सुरुवात होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या(circulation) असतात. या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, रक्तातल्या लघुपेशी, पांढऱ्या रक्त पेशी काही ठिकाणी जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. यालाच धमनी काठिण्य असे म्हणतात.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info