Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
चरबी वाढण्याची खरी कारणे ओळखा
नियमित व्यायाम किंवा खाण्या-पिण्याचे पथ्य पाळल्यानंतरही तुमचे वजन कमी होत नसेल तर सावध व्हा. खरे तर स्थूलपणासाठी काही वेगळेच घटक कारणीभूत आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्याची खरी कारणे तुम्हाला ठाऊक नसतात. त्यामुळेच ती वजन कमी करण्याचा योग्य उपाय करू शकत नाही.
कोणत्याही औषधांचे सेवन करणे, शारीरिक अशक्तपणावर योग्य उपचार न करणे आणि चुकीचा व्यायाम ही कारणे वजन कमी करण्याच्या योजनेत अडथळा आणू शकतात. वजन कमी करण्यात कोणकोणत्या गोष्टींचा अडथळा येतो, याबाबत जाणून घेऊया.
वारंवार चरबी वाढणे
> संभाव्य कारण : मंद मेटाबॉलिझम किंवा जास्त डायटिंग.
साधारणत: तिशीनंतर मेटाबॉलिझम (आराम करतानासुद्धा शरीराची कॅलरी खर्च होते ती गती) मंद होऊ लागतो. तज्ज्ञांच्या मते, 25 वर्षांच्या वयात 200 कॅलरी वाढते तर 35 वर्षांच्या वयात अर्धी म्हणजेच 100 कॅलरी खर्च होऊ शकेल. अशा स्थितीत वजन वाढणे स्वाभाविक आहे. सक्तीने करण्यात येणारी डायटिंगसुद्धा यासाठी जबाबदार आहे.
> उपाय : आठवड्यातून दोनवेळा व्यायाम करण्याचा नियम घालून घ्या. तसेच प्रेस-अप्स, लंग्स आणि स्क्वॅट्स यांसारख्या व्यायाम प्रकारांचा समावेशही रोजच्या उपक्रमात करावा.
औषध घेताना
> संभाव्य कारण : औषधांशी संबंधित साइड इफेक्ट्स.
अॅँटी डीप्रेसेंट, मायग्रेन, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यात येणारी औषधेसुद्धा वजन वाढण्यासाठी जबाबदार असू शकतात.
> उपाय : अशा स्थितीत रुग्णाने तातडीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कारण डॉक्टरच तुम्हाला योग्य पर्याय सांगू शकतात. वजन वाढल्यावर डॉक्टरांना न सांगता औषधांचे सेवन बंद करण्याची चूक करू नये.
फिट आहे; पण फॅट आहे
> संभाव्य कारण : चुकीचा व्यायाम करणे
जर तुम्ही अधिक काळ एकाच जिम रुटीनवर चालत असाल किंवा व्यायामात कोणताच बदल करीत नसाल तर शरीराची कॅलरी खर्च करण्याची क्षमता कमी होईल.
> उपाय : व्यायामाच्या वेळापत्रकात वेळोवेळी बदल करीत राहावे. त्यामध्ये शारीरिक श्रम होतील अशा व्यायामाचा जरूर समावेश करावा. यामुळे मेटाबॉलिझम मंद पडणार नाही. मेडिकल रिसर्च फाउंडेशनच्या व्यायाम व स्थूलपणा विषयाचे तज्ज्ञ म्हणतात की, जॉगिंग किंवा वॉकिंग असा शारीरिक कष्टाचा व्यायाम केल्याने 100 टक्के कॅलरी खर्च केली जाऊ शकते.
पाय, मांड्यांवर चरबी
> संभाव्य कारण : लिपोडेमा
त्वचेच्या टिश्यूजमध्ये चरबीयुक्त पेशींची वाढ होणे आणि त्यामध्ये फ्लूड एकत्र होणे हे मांड्यांमध्ये सूज येण्याचे प्रमुख कारण आहे. अशा स्थितीत पायामध्ये तीव्र वेदना किंवा सेल्युलाइटची (त्वचेवर खड्डे पडणे) समस्या निर्माण होते. याचा चरबीशी कोणताच संबंध नाही. सेल्युलाइट साधारणत: पोटरी, गुडघे, मांड्या आणि कमरेच्या खालच्या भागावर दिसून येतात.
> उपाय : यावर कोणताच उपचार नाही. विशिष्ट प्रकारच्या बॅँडेजने टिश्यूजला साहाय्य करण्याबरोबरच लिंफ सिस्टिममध्ये फ्लूड एकत्र झाल्याने रोखता येऊ शकते.
चेह-यावर सूज येणे
> संभाव्य कारण : थायरॉइड ग्रंथीशी संबंधित समस्या
थायरॉक्सिन आणि ट्रिआडोथीरॉइनसारख्या हार्मोनच्या मदतीने मेटाबॉलिझम नियंत्रित करणे हे गळ्यातील थायरॉइड ग्रंथीचे मुख्य काम आहे. या ग्रंथी हृदयाची गती, शरीराचे तापमान आणि आहाराचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करतात. याशिवाय पातळ केस किंवा नखे, रुक्ष त्वचा आणि थकवा येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. जेव्हा थायरॉइडशी निगडित कार्यप्रणालीत दोष असतो तेव्हा शरीरातील म्युकोपॉलिसेचॅराइड्स नावाचे घटक सक्रिय होतात. यामुळेच चेह-यावर सूज येते.
> उपाय : तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. रक्त तपासणीनंतर जर तुम्हाला हायपोथायरॉयडीझम झाला असेल तर लेवोथायरॉक्सिन (थायरॉक्सिन हार्मोनची सिंथेटीक आवृत्ती) घेण्याचा सल्ला देण्यात येईल.
कमरेवर अधिक ताण
> संभाव्य कारण : फूड इंटॉलरन्स
जेवल्यानंतर मळमळणे, डायरिया किंवा भीती वाटण्याबरोबरच थकवा आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसून आल्यास विशिष्ट खाद्यपदार्थ पचवण्यास तुम्ही असमर्थ आहात, असा त्याचा अर्थ आहे. अशा स्थितीत खाद्यपदार्थ चांगल्यारीतीने न पचता अंशत: डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्येच राहून जातात. यामुळे गॅस तयार होणे आणि पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. उदा.अनेकांना लॅक्टोज नावाचे घटक असल्यामुळे दूध पचत नाही.
> उपाय : जे काही खाल्ले असेल त्याची डायरीमध्ये नोंद करावी. जर एखाद्या औषधाचे सेवन करीत असाल तर त्याचीही नोंद ठेवावी. या खाद्यपदार्थांच्या पर्यायाबाबत डॉक्टरांशी चर्चा करावी.
पोटाच्या खालील भागात चरबी
> संभाव्य कारण : पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम
ही वास्तविक हार्मोनशी निगडित समस्या आहे. ही समस्या सुमारे पाच ते दहा टक्के महिलांमध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर जाणवते. अशा स्थितीत महिलेच्या पोटाखालचा भाग वाढू लागतो. तज्ज्ञांच्या मते, बाळंतपण झाल्यानंतर लगेचच असे होईल, हे गरजेचे नाही. अनेकवेळा रजोनिवृत्तीच्यावेळी, त्याआधी किंवा त्यानंतरसुद्धा पोट, छाती आणि पाठीच्या आजूबाजूला चरबी वाढू लागते. याशिवाय महिलांमधील अनियमित मासिक पाळी, वेदना किंवा चेह-यावर केस येणे यांसारख्या समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात. या समस्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढवण्याचे संकेत देतात. अशा स्थितीत महिलांच्या शरीरात रक्तशर्करा यकृतापर्यंत न पोहोचता चरबीत त्याचे रूपांतर होऊनही चरबी पोटाच्या खालच्या भागात जमा होऊ लागते. परिणामी पोट लटकल्यासारखे वाटते. ही परिस्थिती शरीरातील अंतर्गत अवयवांसाठी जोखमीची आहे.
> उपाय : अनियमित मासिक पाळीमुळे वजन वाढत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच रक्त तपासणी किंवा अल्ट्रासाऊंड स्कॅनच्या मदतीने शोध घेता येतो. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर इन्सुलीन नियंत्रित करणारे डाएट किंवा औषध घेण्याचा सल्ला देतात.
| --------------------------- | --------------------------- |