Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
2 वर्षांच्या मुलांसाठी आठवड्याभराचा डाएट चार्ट
आपण बाळ खाऊ लागलं की त्याला आपल्या मनाने कोणतेही पदार्थ खाऊ घालतो पण असं केल्याने त्याच्या शरीराला व आरोग्याला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे जर बाळाच्या विकासात वाढ व्हावी असं वाटत असेल तर खाली दिलेला डाएट चार्ट नक्की फॉलो करा व मुलांना ंतंदरुस्त बनवा.
बाळाला काय खाऊ घालावे आणि काय नाही याबद्दल पालक नेहमी चिंतातूर असतात. बाळ 6 महिन्यांपर्यंत केवळ आईच्याच दुधावर वाढते. पण 6 महिन्यांनंतर त्याला ठोस आहाराची गरज भासते. हाच तो काळ असतो ज्या काळात तुम्ही बाळाला योग्य प्रमाणात पोषण आहार देणे अपेक्षित असते. जर इथे बाळाचे पोषण कमी पडले तर त्याला शारीरिक समस्या सुरु होण्यास वेळ लागणार नाही. आज आपण या लेखातून हेच जाणून घेऊया की बाळ वयात येण्यास सुरुवात झाल्यावर त्याला नेमकं काय खाऊ घालावं. त्याचा आहार कसा असावा? त्यासाठी योग्य डायट प्लान कोणता? या गोष्टीमुळे पालकांच्या मनातील चिंता सुद्धा दूर होईल आणि तुम्ही आपल्या बाळाला योग्य प्रमाणात पोषण आहार देऊ शकता. (diet chart for 2 years babies)
2 ते 3 वर्षांच्या मुलांचा आठवड्याभराचा डाएट चार्ट
सोमवारचा आहार
• नाश्ता : लोण्यासोबत मेथीचा पराठा आणि एक ग्लास दूध
• दुपारचे जेवण : काळ्या वाटण्याची भाजी, कडधान्याची भाजी, चपाती आणि दही
• संध्याकाळचा नाश्ता : सफरचंद
• रात्रीचे जेवण : सोयाबीन आणि शिमला मिरचीची ग्रेवी, भाजी आणि भात
मंगळवारचा आहार:
• नाश्ता : केळा, दूध आणि सोबत खिचडी
• लंच : राजमा, जिरा भात आणि भाजी
• संध्याकाळचा नाश्ता : पेर
• रात्रीचे जेवण : बटाटा मटारची भाजी आणि चपाती
बुधवारचा आहार
• नाश्ता : उतप्पा आणि नारळाची चटणी व सोबत ताक
• दुपारचे जेवण : पनीर पुलाव, बीटची भाजी
• संध्याकाळचा नाश्ता : अननस
• रात्रीचे जेवण : मिक्स भाज्यांची खिचडी आणि गाजराची कोशिंबीर
• नाश्ता : मुगडाळचे स्प्राऊट्स आणि एक ग्लास दूध
• दुपारचे जेवण : उडदाची डाळ, भाजी, भात आणि दही
• संध्याकाळचा नाश्ता : द्राक्षे
• रात्रीचे जेवण : बटाटा आणि कांद्याचा पराठा आणि दही
शुक्रवारचा आहार
• नाश्ता : डोसा, सांबर आणि एक ग्लास ताक
• लंच : छोले भाजी, पडवळची भाजी, भात आणि दही
• संध्याकाळचा नाश्ता : संत्री
• रात्रीचे जेवण : व्हेजिटेबल पुलाव आणि कोशिंबीर
विकेंडचा आहार
शनिवारचा आहार
• नाश्ता : कडधान्ये, गाजर, नारळ व रव्याचा उपमा, एक ग्लास ताक
• दुपारचे जेवण : कढी, जिरे घातलेली बटाट्याची भाजी आणि भात
• संध्याकाळचा नाश्ता : केळी
• रात्रीचे जेवण : मशरूम, मटार आणि मक्याची भाजी, चपाती
रविवारचा आहार
• नाश्ता : पनीर भुर्जी, टोस्ट, एक ग्लास दूध
• दुपारचे जेवण : चपाती आणि कडधान्याची भाजी
• संध्याकाळचा नाश्ता : चिकू
• रात्रीचे जेवण : सांबर आणि भात
| --------------------------- | --------------------------- |