Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
ताप आल्यास घरगुती उपाय – Home Remedies For Fever In Marathi
ताप आल्यावर काही घरगुती उपचार इतके परिणामकारक असतात की त्याने तुम्हाला लगेच बरे वाटते. अगदी पूर्वपरंपरागत हे उपाय करण्यात येत आहेत. याचा फायदाही तुम्हाला होतो. असे कोणते घरगुती उपाय आहेत ते आपण पाहूया.
थंड पाण्याची पट्टी (Cold Water Patti)
साहित्य
थंड पाणी
स्वच्छ कॉटनचा कपडा
वापरण्याची पद्धत
थंड पाणी एका बाऊलमध्ये घ्यावे आणि असे दोन बाऊल आपल्याजवळ ठेवावे
एका बाऊलमध्ये कॉटनचा कपडा भिजवून पाणी पिळून घ्यावे
नंतर आपल्या कपाळावर त्याची पट्टी करून ठेवावी
साधारण एक एक मिनिट्सने हीच प्रक्रिया करावी. काही वेळ असे करत राहिल्याने ताप उतरतो
फायदा
ताप आल्यावर सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे. यामुळे शरीरातील उष्णता शोषून घेतली जाते आणि ताप कमी करण्यास याचा फायदा मिळतो. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने ताप डोक्यात शिरण्यापासून बचाव होतो. ताप आल्यावर तो नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याचा मेंदूवर परिणाम झाल्यास परिस्थिती गंभीर होते. त्यावर अत्यंत गुणकारी ठरते ते थंड पाण्याची पट्टी. खरं तर संपूर्ण शरीरावर पट्ट्या ठेवाव्या. पण तसे शक्य नसल्यास, किमान कपाळ आणि तळपायावर या पट्ट्या ठेऊन ताप काढता येईल याची काळजी घ्यावी.
तुळस (Tulsi)
साहित्य
तुळशीची पाने
सुंठ
साखर
पाणी
वापरण्याची पद्धत
गॅसवर पाणी उकळायला ठेवा. यामध्ये सुंठ, तुळशीची पाने आणि साखर मिक्स करा
व्यवस्थित पाणी उकळायला लागले की बंद करा
तयार झालेला काढा गाळून घ्या आणि ताप आलेल्या व्यक्तीला थंड करून प्यायला द्या
फायदा
ताप आलेल्या व्यक्तीसाठी तुळस हा उत्तम घरगुती रामबाण उपाय आहे. कोणतीही व्यक्ती रोज सकाळी किमान तुळशीची पाच पाने खाईल तर आयुष्यात त्या व्यक्तीला ताप, सर्दी यासारख्या व्हायरल गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही. तुळशीने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तींना ताप, व्हायरल ताप अथवा ताप सतत येत असेल त्यांनी तुळशीचे रोज सेवन करावे. तुळस हा उत्तम आयुर्वेदिक उपचार आहे. तसंच यामुळे शरीराला कोणतेही नुकसान पोहचत नाही.
मध (Honey)
साहित्य
मध
पाणी
पुदिना
आले
वापरण्याची पद्धत
पाणी उकळत ठेवणे आणि त्यात पुदिन्याची आणि आल्याची पाने घालून उकळवणे
पाणी उकळल्यानंतर ते गाळून घेणे आणि त्यात मध घालून मिक्स करणे
हे पाणी थंड झाल्यावर पिणे. ताप त्वरीत उतरण्यास मदत मिळते
फायदा
मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुण असतात. तसंच आल्यामध्ये आणि पुदिन्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता असल्याने आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता असल्याने हे मिश्रण ताप उतरविण्यासाठी हे मिश्रण योग्य उपाय ठरते. मधाचे फायदे अनेक आहेत.
आले (Ginger)
आले (Ginger)
साहित्य
आल्याचे तुकडे अथवा आल्याची पावडर
पाणी
वापरण्याची पद्धत
तुमच्याजवळ बाथटब असेल तर यामध्ये गरम पाणी घाला आणि त्यामध्ये आल्याची पावडर साधारण दोन ते तीन चमचे मिक्स करा
या पाण्यात साधारण दहा मिनिट्स तसंच पडून राहा आणि आपलं शरीर याच पाण्याने स्वच्छ करा
टॉवेलने पुसून गादीवर पुन्हा येऊन झोपा. यामुळे तुम्हाला गरम होईल. पण तरीही तुम्ही अंगावर चादर होऊन झोपा. जेणेकरून तुम्हाला घाम येईल आणि ताप पटकन उतरेल
जर ही पद्धत नको असेल तर तुम्ही पाणी उकळवा त्यात आल्याचे तुकडे घालून पाणी उकळवा
नंतर पाणी गाळून घ्या आणि त्यात मध मिक्स करून हा चहा प्या. यामुळेदेखील ताप उतरण्यास मदत मिळते
फायदा
तापामध्ये आल्याचा भरपूर फायदा होतो. तापामुळे होणारी सर्दी अथवा खोकला संपविण्यासाठी आल्याचा फायदा होतो. यातील अँटिइन्फ्लेमेटरी घटक तापापासून सुटका मिळविण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच आल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत मिळते. आले टिकवूनही ठेवता येते. तापात घसा दुखत असल्यास आल्याचा चहा त्यावर अत्यंत परिणामकारक घरगुती उपाय आहे.
अॅपल साईड व्हिनेगर (Apple cider vinegar)
साहित्य
थंड पाणी
अॅपल साईड व्हिनेगर
स्वच्छ कॉटनचा कपडा
वापरण्याची पद्धत
थंड पाणी एका बाऊलमध्ये घ्यावे आणि असे दोन बाऊल आपल्याजवळ ठेवावे. त्यामध्ये एक बूच अॅपल साईड व्हिनेगर मिक्स करा
एका बाऊलमध्ये कॉटनचा कपडा भिजवून पाणी पिळून घ्यावे
नंतर आपल्या कपाळावर त्याची पट्टी करून ठेवावी
साधारण एक एक मिनिट्सने हीच प्रक्रिया करावी. काही वेळ असे करत राहिल्याने ताप उतरतो
फायदा
ताप आल्यावर सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे. त्यामध्ये अॅपल साईड व्हिनेगर घातल्यास, तुम्हाला अधिक चांगला परिणाम मिळतो. ताप पटकन उतरायाला मदत मिळते. यामुळे शरीरातील उष्णता शोषून घेतली जाते आणि ताप कमी करण्यास याचा फायदा मिळतो. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने ताप डोक्यात शिरण्यापासून बचाव होतो. व्हिनेगरमुळे अंगातली उष्णता बाहेर येण्यास मदत मिळते.
लसूण (Garlic)
साहित्य
लसणीच्या पाकळ्या
वापरण्याची पद्धत
लसणीच्या पाकळ्यांची साले काढून टाकणे
कच्ची लसूण तापामध्ये तोंडात घालून चघळणे
फायदा
लसणामध्ये डायफोरेटिक गुणधर्म असतात जे ताप आल्यावर अंगातील घाम काढण्यास फायदेशीर ठरते. ताप आल्यावर अंगाला घाम येणे अत्यंत गरजेचे असते. अंगात घाम आणण्यासाठी लसणीचा फायदा करून घेता येतो. याशिवाय लसणामध्ये अँटिटॉक्झिक, अँटिफंगल, अँटिबॅक्टेरियल गुणधर्मही आढळतात. ज्याचा तुमच्या शरीराला अत्यंत फायदा होतो. प्रतिकारशक्ती वाढून ताप पटकन कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे घरगुती उपाय करताना तुम्हाला ताप आला तर तुम्ही लसूण चघळा.
पुदीना (Mint)
साहित्य
पुदीना
पाणी
आले
मेथी
मध
वापरण्याची पद्धत
पाणी उकळवा आणि त्यात पुदिन्याची पाने, आल्याचे तुकडे, मेथी दाणे घाला
हे पाणी उकळल्यावर गाळून घ्या
त्यामध्ये मध मिक्स करून प्या
फायदा
कोणत्याही तापावर उत्तम उपाय म्हणजे पुदिना आणि आल्याचा काढा. हा काढा प्यायल्यानंतर तुमचा ताप पटकन उतरण्यास मदत मिळते. शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी पुदिना हा उत्तम उपाय आहे. तसंच आले आणि मेथी, मधाची साथ यामध्ये अधिक उपयोगी ठरते.
हळदीचे दूध (Turmeric Milk)
साहित्य
हळद पावडर
दूध
वापरण्याची पद्धत
एक ग्लास दूध गरम करून घेणे
त्यात एक चमचा हळद पावडर मिक्स करून गरम दूध पिणे
फायदा
हळदीमध्ये क्युरक्युमिन घटक अधिक प्रमाणात असतात. यामधील अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म हे प्रतिकारकशक्ती सुधारण्यास फायदेशीर ठरतात. हळदीमुळे तापात झालेला कफ, घशातील खवखव पटकन कमी होण्यास मदत मिळते. तसंच हळदीने सर्दी आणि खोकलाही पटकन निघून जातो. त्यामुळे उत्तम घरगुती उपाय म्हणून तापावर याचा उपयोग करून घेता येतो. हळद ही ताप, सर्दी आणि खोकला या तिन्हीवर रामबाण इलाज आहे. याशिवाय तुम्ही मीठ, हळद आणि मधाचं चाटण करून खाल्लं तरीही त्याचा फायदा होतो.
ग्रीन टी (Green tea)
साहित्य
पाणी
ग्रीन टी बॅग
वापरण्याची पद्धत
पाणी उकळवून घ्या
त्यामध्ये ग्रीन टी बॅग बुडवा आणि मग गरम ग्रीन टी प्या
फायदा
ग्रीन टी मध्ये अनेक नैसर्गिक वनस्पतींचा भरणा असतो. जे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. सर्दी, थंडी, ताप आणि अंग दुखत असेल तर तुम्ही ग्रीन टी मधील आल्याचा आणि लवंगचा स्वाद असणारा ग्रीन टी पिऊ शकता. दिवसातून दोन वेळा याचे सेवन केल्यानेही ताप कमी होतो. यामधील अँटिबॅक्टेरियल गुण तुम्हाला अधिक प्रतिकारशक्ती मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात.
मुलेठी (Mulethi)
साहित्य
मुलेठी
तुळस
पाणी
मध
साखर
वापरण्याची पद्धत
पाणी उकळवायला ठेवणे आणि त्यामध्ये तुळस, मुलेठी, साखर घालून पाणी उकळवणे
पाणी उकळल्यावर गाळून घेणे आणि त्यात मध मिक्स करणे
हे पाणी दिवसातून दोन वेळा प्यायल्याने ताप कमी होतो
फायदा
व्हायरल तापामध्ये थकवा पटकन येतो. हा थकवा कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मुलेठीचा हा काढा अत्यंत उपायकारक ठरतो. मुलेठी हा नैसर्गिक घटक असल्याने याचा उपयोग करून घेता येतो. तसंच मुलेठी हा आयुर्वेदिक उपाय आहे. यामुळे नुकसान होत नाही.
दालचिनी (Cinnamon)
साहित्य
पाणी
दालचिनी
लवंग
सुंठ
साखर
वापरण्याची पद्धत
पाणी उकळत ठेवणे आणि त्यामध्ये दालचिनी, लवंग, सुंठ आणि साखर घालणे
हे उकळलेले पाणी अर्थात काढा गाळून घेणे
गरम गरम पिणे
फायदा
तापामध्ये बऱ्याचदा सर्दी आणि खोकल्याचाही त्रास होत असतो. अशावेळी घशाला आराम देण्यासाठी आणि ताप पटकन घालविण्यासाठी दालिचिनीचा काढा हा घरगुती उपाय चांगला फायदेशीर ठरतो. दालचिनी, लवंग यामधील अँटिऑक्सिडंट्स तापावर उपयोगी ठरतात. दालचिनीचे अनेक फायदे आहेत. व्हायरल ताप उतरविण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.
| --------------------------- | --------------------------- |