healthplanet.net

Posted on

गरोदरपणात स्तनांची कशी काळजी घ्यावी ?

आंघोळ करताना स्तन व स्तनांची बोंडे नीट धुवावीत. दबलेली बोंडे बाहेर ओढून स्वच्छ करावीत. तसेच चिरा पडल्या असल्यास रोज तेल लावावे म्हणजे बाळाला पुढे दूध पिताना त्रास होणार नाही.
गरोदरपणात दातांची निगा कशी राखावी ?

गरोदरपणात दातांची काळजी घेणे आवश्यक असते. दात रोज दोन वेळा ब्रश किंवा पावडरने स्वच्छ घासावीत. एकदा सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ करावेत. काही खाल्ल्यानंतरही गुळणा करण्याची सवय चांगली असते. त्यामुळे दातांच्या भेगात अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडतात. हिरड्यासुद्धा बोटाने चोळाव्यात.
गरोदरपणात धनुर्वात प्रतिबंधक लस कधी टोचून घ्यावी ?

गरोदरपणात चौथ्या महिन्यात पहिल्या व नंतर एक महिन्याने दुसरा डोस घ्यावा. त्यामुळे बाळाचे व आईचे धनुर्वातापासून संरक्षण होते.
गरोदरपणात लोहाच्या गोळ्या का घ्यावयास सांगतात ?

आहारामध्ये दूध, पालेभाज्या, फळे यांचे प्रमाण कमी लोहाची कमतरता जाणवते. गरोदर स्त्रियांमध्ये रक्ताशयाचे/ आनिमियाचे बरेच प्रमाण दिसून येते. म्हणूनच त्यासाठी लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. प्रत्येक गरोदर स्त्रीने निदान १०० दिवस तरी लोहाच्या गोळ्या घ्यायला पाहिजेत म्हणजे रक्ताक्षयाचा धोका टाळता येतो. लोखंडी कढईचा दररोजचे जेवण बनविण्याकरीता वापर केला तर त्या मध्ये जास्त प्रमाणात लोह मिळते. म्हणून गोळ्या घेत असतांना अशा प्रकारचे घरगुती उपाय देखील महत्त्वाचे ठरतात.
गरोदरपणात विशेष काळजी केव्हा घ्यावी लागते ?

मातेचे वय ३५ वर्षांहून अधिक असेल तर
मातेचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर
आधीचे मुल ३ वर्षांपेक्षा लहान असेल तर
५ मुलांपेक्षा अधिक मुले असतील तर
उंची ४ फुट १० इंचापेक्षा कमी असेल तर
वजन ७० किलो पेक्षा जास्त असेल तर
जुळे होण्याची शक्यता असेल तर
पूर्वीचे सिझेरियन झालेले असेल तर
आईला काही गंभीर आजार असेल तर
मूल आडवे किंवा पायाळू असेल तर

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info