Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे.
क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.
ते अवयव
मेंदूची आवरणे,
मणके व इतर हाडे,
लैंगिक अवयव.
प्रकार :
फुफ्फुसाचा क्षयरोग
दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)
अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)
फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा
ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )
हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग
जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )
मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )
आतडयाचा क्षय्ररोग
क्षय रोगाची लक्षणे
कमी होणारे वजन
थकवा जाणवणे
श्वास घेण्यास त्रास होणे
ताप येणे
रात्री येणारा घाम
भूक न लागणे
आजार टाळण्याचे उपाय "
क्षय रोगापासून वाचण्यासाठी जन्म झालेल्या लहान बाळाला बी.सी.जी नावाची लस दिली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे
पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.
क्षय रोग तपासण्या करून घेणे
क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे
तोंड झाकणे
लक्षणे
दोन आठवडय़ांहून अधिक काळ
बेडकायुक्त खोकला (१५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा )
हलकासा परंतु रात्री येणारा ताप
घटणारे वजन.
भूक कमी होणे.
बेडक्यातून रक्त पडणे.
थकवा
छातीत दुखणे
रात्री येणारा घाम
मानेला गाठी येणे
जीवाणू पसरण्याचे मार्ग
उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो.
दूषित धुलिकण
बाधित व्यक्तीची थुंकी.
बाधित व्यक्तीचे इतर स्राव
क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक
जास्ती वय असलेले
लहान बाळे
दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे
कमी पोषकता
दारूच्या आहारी गेलेले
जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे
अस्वच्छतेत राहणारे
उपचार
सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती
औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.
जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.
निदान
खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.
चाचण्या-
खकाऱ्याची तपासणी-
वयस्कांमध्ये- सकाळीचचा खकारा निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिअल नेल्सन स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देउन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर जीवाण् सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण समजले जाते.
लहान मुलांमध्ये- सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून एनजीटी टाकून जठरातील द्रव निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्यावर अल्कोहोलची प्रक्रिया करून चिकटवला जातो. त्यावर झिनलेन्स स्टेन या पद्धतीने पेशींना रंग देऊन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.
मॉन्टुक्स टेस्टद्वारेही रोगाचे निदान केले जाते.
रक्ताच्या तपासण्या-
इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवाच्या सहाय्याने संकलित करून तो नलिकेमध्ये भरला जातो व त्या नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते. ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर रोगांमध्येही ही तपासणी असामान्य असू शकते[ संदर्भ हवा ].
आजारपणातील घ्यावयाची काळजी
खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.
खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.
रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी
लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे
घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.
| --------------------------- | --------------------------- |