healthplanet.net

Posted on

वयानुसार किती असावी कोलेस्टेरॉलची पातळी? तुम्हाला माहितीच हवं हे प्रमाण

रक्तात एलडीएल, एचडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी किती आहे हे तपासण्यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट केली जाते. रक्तात सर्व प्ररकारच्या कोलेस्टेरॉलची पातळी नेमकी किती असावी याविषयीची जाणून घेऊया.

हृदयाच्या आरोग्यासाठी रक्तातली कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात असणं आवश्यक असतं. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात गुड कोलेस्टेरॉल आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात बॅड कोलेस्टेरॉल हे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. रक्तातली कोलेस्टेरॉलची पातळी अधिक असल्यास त्यासंबंधीच्या विकाराला हायपरकोलेस्टेरॉलेमिया, हायपरलिपिडेमिया किंवा हायपरलिपोप्रोटिनेमिया असं म्हणतात. सर्वसामान्यपणे कोलेस्टेरॉल हा पेशींमध्ये आढळणारा फॅट्ससारखा पदार्थ होय.

शरीराला हॉर्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि अन्नपचनासाठी मदत करणारे पदार्थ तयार करण्याकरिता काही कोलेस्टेरॉलची गरज भासते. आपलं शरीर आवश्यक कोलेस्टेरॉलची निर्मिती करतं. तसंच अंड्यातला बलक, मांस आणि चीज या पदार्थांमधूनही कोलेस्टेरॉल मिळतं. रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्यास ते रक्तातल्या इतर पदार्थांच्या मदतीनं प्लाक तयार करतं. हे प्लाक रक्तवाहिन्यांच्या वॉलला चिकटून राहतं. प्लाक जमा होण्याच्या क्रियेला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज होतो. तसंच हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वाढते. रक्तातल्या कोलेस्टेरॉलच्या एकूण प्रमाणानुसार त्याचे एचडीएल, एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्स हे प्रकार पडतात.

एलडीएल अर्थात बॅड कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वाढते. एचडीएल अर्थात गुड कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकारापासून तुमचं संरक्षण होतं. एकूण कोलेस्टेरॉलमध्ये ट्रायग्लिसराइड्सचा काउंटही समाविष्ट होतो. ट्रायग्लिसराइड्स हादेखील फॅटचा एक प्रकार आहे. हे फॅट्स शरीरात तयार होतात आणि ते कोलेस्टेरॉलचे `बिल्डिंग ब्लॉक्स` मानले जातात. रक्तात ट्रायग्लिसराइड्सची वाढलेली आणि एचडीएलची कमी असलेली पातळी हृदयविकारास आमंत्रण देणारी ठरते.

रक्तात एलडीएल, एचडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी नेमकी किती आहे, हे तपासण्यासाठी लिपिड प्रोफाइल नावाची टेस्ट केली जाते. रक्तात प्रत्येक कोलेस्टेरॉलची पातळी नेमकी किती असावी याविषयीची माहिती आता जाणून घेऊया.

सर्वसामान्यपणे कोलेस्टेरॉलची पातळी मिलिग्रॅम प्रति डेसिलीटरमध्ये मोजली जाते. पुरुष आणि महिलांमध्ये याची सरासरी पातळी वेगळी असते. कोलेस्टेरॉलसाठी केली जाणारी लिपिड प्रोफाइल ही टेस्ट रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 12 तासांनी केली जाते.

कोलेस्टेरॉलची योग्य पातळी : रक्तात 200 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी कोलेस्टेरॉल असल्यास चांगलं (Good) मानलं जातं; पण ते यापेक्षाही कमी असणं उत्तम ठरतं. एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी 60 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक असणं योग्य असतं. पुरुषांमध्ये एचडीएल 40 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक असावं. महिलांमध्ये एचडीएलची पातळी 50 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक असणं चांगलं मानलं जातं. एलडीएल अर्थात बॅड कोलेस्टेरॉलची पातळी 100 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी असावी. कोरोनरी आर्टरी डिसीज असेल, तर ही पातळी 70 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तसंच ट्रायग्लिसराइड्सची पातळी 149 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी असावी.

कोलेस्टेरॉलची मध्यम प्रमाणात वाढलेली पातळी : रक्तातल्या एकूण कोलेस्टेरॉलचं प्रमाण 200 ते 239 मिलिग्रॅम/डेसिलीटर दरम्यान असेल तर ते मध्यम प्रमाणात वाढलेलं असतं. तसंच एलडीएलची पातळी 130 ते 159 मिलिग्रॅम/डेसिलीटरदरम्यान आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी 150 ते 199 मिलिग्रॅम/डेसिलीटरदरम्यान असेल, तर ती मध्यम स्वरूपात वाढलेली असते.

कोलेस्टेरॉची हाय (High) अर्थात उच्च पातळी : रक्तातल्या एकूण कोलेस्टेरॉलचं प्रमाण 240 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा जास्त असेल, तर ते च्च मानलं जातं. एचडीएलची पातळी 60 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक एलडीएलची पातळी 160 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक, तर ट्रायग्लिसराइड्सची पातळी 200 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ती उच्च मानली जाते. एलडीएलची पातळी 190 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा अधिक असेल तर सर्वोच्च मानली जाते. ट्रायग्लिसराइड्सची पातळी 500 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा अधिक असेल तर सर्वोच्च ठरते.

कोलेस्टेरॉलची लो (Low) अर्थात कमी पातळी : एचडीएलची रक्तातली पातळी पुरुषांमध्ये 40 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी आणि महिलांमध्ये 50 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी असेल तर ती लो समजली जाते.

सर्व मुलांचं (Children) कोलेस्टेरॉल 9 ते 11 वर्षं वयादरम्यान आणि त्यानंतर पुन्हा 17 ते 21 वर्षांदरम्यान तपासणं योग्य असतं. ज्या मुलांना डायबेटीस, लठ्ठपणा या समस्या असतात, तसंच कोलेस्टेरॉलची कौटुंबिक पार्श्वभूमी असते, अशा मुलांची कोलेस्टेरॉल तपासणी वयाच्या दुसऱ्या आणि 8व्या वर्षी करावी. त्यानंतर ही तपासणी पुन्हा वयाच्या 12व्या किंवा 16 व्या वर्षी करावी.

मुलांमधली एकूण कोलेस्टेरॉल पातळी 170 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ती चांगली मानली जाते. एचडीएलची पातळी 45 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा अधिक, एलडीएलची पातळी 10 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी असणं चांगलं मानलं जातं. 9 वर्षं वयापर्यंतच्या मुलांमधली ट्रायग्लिसराइड्सची पातळी 75 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी आणि 10 ते 19 वर्षं वयोगटातल्या मुलांची ट्रायग्लिसराइड्सची पातळी 90 मिलिग्रॅम/डेसिलीटरपेक्षा कमी असणं चांगलं असतं. मुलांमध्ये एकूण कोलेस्टेरॉल 170 ते 199 मिलिग्रॅम/डेसिलीटर, एचडीएल पातळी 40 ते 45 मिलिग्रॅम/डेसिलीटर, तर एलडीएलची पातळी 110 ते 129 मिलिग्रॅम/डेसिलीटर असेल तर बॉर्डरलाइन मानली जाते. 9 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांची ट्रायग्लिसराइड्सची पातळी 110 ते 129 मिलिग्रॅम/डेसिलीटर, तर 10 ते 19 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली पातळी 90 ते 129 मिलिग्रॅम/डेसिलीटर असेल तर ती बॉर्डरलाइन मानली जाते.

लहान मुलांमध्ये एकूण कोलेस्टेरॉल पातळी 200 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर उच्च समजली जाते. एलडीएलची पातळी 130 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ती उच्च ठरते. 9 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांची ट्रायग्लिसराइड्सची पातळी 100 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक असेल आणि 10 ते 19 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांची हीच पातळी 130मिलिग्रॅम/डेसिलीटर पेक्षा अधिक असेल तर ती उच्च समजली जाते. कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे योग्य आहार, व्यायाम, ताण-तणाव व्यवस्थापन आणि वैद्यकीय उपचारांच्या मदतीनं ही पातळी नियंत्रणात ठेवणं आवश्यक असतं.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info