Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
कुपोषण म्हणजे काय ?
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.
कारणे
लवकर अंगावरील दुध पाजणे बंद करणे.
बाळाला भरपूर व वेळेवर अंगावरील दुध न मिळणे.
पुरक पोषक आहारास उशीरा सुरवात.
आहारात अ जीवनसत्त्वाचा अभाव.
सतत आजारी पडणे.
दोन मुलांमध्ये कमी अंतर.
लक्षणे
कृश अंगकाठी, वजन कमी, पोटाचा नगारा, हातापायाच्या कड्या, केस पिंगट, उदास व खिन्न चेहरा, वजनात घट ( कधी कधी सुजेमुळे जास्त ) चामडीवर काळे डाग किंवा फोड, पायावर सुज
सौम्य प्रकार
वजनात फार हळुहळु वाढ
पोटाचा नगारा
कृश अंगकाठी
भूक मंदावणे
निरुत्साही
फिक्कटपणा ( रक्तपांढरी किंवा अनिमिया )
माती खाण्याची इच्छा
ओठांच्या कोपऱ्यात भेगा
नेहमी सर्दी वा तत्सम जंतूजन्य आजार
रातांधळेपणा
गंभीर प्रकार
मुलाच्या वजनात वाढ न होणे
पाय व कधी कधी तोंड सुजने
शरीरावर काळे डाग पडणे
केस गळायला सुरुवात होणे, टक्कल पडणे
नेहमीच्या हसण्या- खेळण्यात रस न घेणे
तोंडात फोड किंवा पटटे येणे
वाढत्या वयोमानानुसार बुद्धीची वाढ न होणे
डोळ्यांतील पांढराभाग खरखरीत होवून नंतर अंधत्व येणे.
कुपोषणाचे दुष्परिणाम
वजन न वाढणे व वाढ न होणे
चालणे, बोलणे व विचारशक्ती या क्रिया मंदावणे.
हातापायाच्या कड्या व पोटाचा नगारा होणे.
चेहऱ्यावर उदासपणा व निरुत्साही वृत्ती
हात, पाय व चेहरा यावर सुज आणि चामडीवर डाग व फोड येणे.
केस विरळ होणे व गळणे आणि केसांचा रंग पिंगट होऊन ते निस्तेज होणे.
अनिमिया होणे
प्रतिकारकशक्ती कमी होणे
जंतुदोषाचे प्रमाण वाढणे
कुपोषित मुलांना गोवरचा जास्त धोका असतो.
टी.बी. व क्षयाचा विकार वाढतो.
अनेक माता आपले मूल आजारी पडले असतांना किंवा त्याला जुलाब होत असतांना सकस आहार देण्याचे थांबवतात. परिणामी मुलाचा अशक्तपणा अधिकाधिक वाढून ते मृत्युमुखी पडायचा सुद्धा धोका असतो. आजारी मुलांना पोषक आहाराची जास्त गरज असते. तो देण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवे.
कुपोषणावरील प्रतिबंधक उपाय
बाळाला एक ते दिड वर्षे स्तनपान करणे.
बाळाला पहिल्या दिवशी पासुन वेळेवर दुध पाजणे.
सहा महिन्यांनंतर लगेचच स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराला सुरुवात करावी.
दोन मुलांमधील अंतर कमीत कमी तीन वर्ष असावे.
मुलाचे सर्व लसीकरण वेळेवर करावे.
अंगणवाडीचा पोषक आहार मुलांना वेळेवर व नियमित दयावा.
दंडाचा घेर कुपोषणासाठी उपयोगी तपासणी
एक वर्षावरील मुल चेहऱ्यावरून व हातापायावरून कितीही मोठे दिसत असले तरीही त्याच्या दंडाच्या मध्यभागी मोजपट्टीने घेतलेला घेर १३ सें.मी. च्या खाली जर घेर असेल तर कुपोषण गंभीर प्रकारचे आहे.
अंगावरच्या दुधाशिवाय इतर कोणतेही अन्न नसणारी मुले कित्येक वेळा दिसायला गुटगुटीत दिसली तरी सुद्धा ती कुपोषणाच्या सीमारेषेवर असतात. जुलाब, किंवा सर्दीचा एखादा सौम्य आजार देखील त्याला कुपोषित करतो. मुल सशक्त आहे की कुपोषित आहे हे समजून घेण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्यांचे वजन दर महिन्याला घेणे हा होय.
| --------------------------- | --------------------------- |