healthplanet.net

Posted on

शरीरात किडणीची गरज आणि महत्व काय आहे?

प्रत्येक व्यक्ती घेत असलेल्या आहारच्या प्रकारात आणि त्याच्या प्रमाणात दर दिवशी बदल होत असतो .
आहारातल्या विविधतेमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण, आम्ल तसेच क्षार पदार्थाच्या प्रमाणात सातत्याने बदल होत असतात.
आहाराचे पचन होत असतांना अनेक अनावश्यक पदार्थ शरीरात तयार होतात.
शरीरात पाणी,आम्ल,क्षार, आणि रसायने आणि शरीरातून उत्सर्जित होणा-या इतर पदार्थाचे संतुलन बिघडलेले किंवा त्यात बाधा आली तर ते जीवघेणेही ठरू शकते.
किडणी शरीरातील अनावश्यक द्रव्य आणि इतर पदार्थांना मुत्राच्या रुपात बाजूला करून रक्ताचे शुद्धीकरण करते .तसेच शरीरात क्षार आणि आम्लाचे संतुलन ठेवते ,रक्तातले त्यांचे योग्य प्रमाणही कायम राखते. अशा रीतीने किडणी शरीराला स्वच्छ् आणि निरोगी ठेवते.

किडनीचे मुख्य कार्य

रक्ताचे शुद्धीकरण - किडणी कायम कार्यरत राहून शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना मूत्राशयाद्वारे बाहेर टाकते.
शरीरातील पाण्याचे संतुलन : किडनी शरीरासाठी आवश्यक त्या पाण्याची मात्र कायम ठेवते. अधिक जमा झालेले पाणी मूत्राद्वारे बाहेर काढून टाकते
आम्ल आणि क्षारांचे संतुलन : किडणी शरीरात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फ रस, बायकार्बोनेट वगैरेचे प्रमाण यथायोग्य ठेवण्याचे कार्य करते. हे सर्व पदार्थ शरीरात आम्ल तसेच क्षारांच्या प्रमाणासाठी जबाबदार असतात. सोडियमचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले तर हृद्य आणि स्नायूंच्या हालचालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
रक्तदाबावर नियंत्रण : किडणी अनेक हार्मोन्स (संप्रेरक) निर्मित करते जसे एंजियोटेन्सीन, एल्डोस्टोरेन, प्रोस्टागेल्डीन, वगैरे. या हार्मोन्सच्या मदतीने किडणी शरीरात रक्तदाब योग्य राखण्याचे कार्य करते
रक्तकणांच्या निर्मितीत सहाय्य : रक्तात असलेल्या लाल रक्तकणांचे उत्पादन एरीथ्रोपेएटीनच्या मदतीने अस्थिमज्जा (Bone Marrow )मध्ये होते. एरीथ्रोपेएटीन किडणीमध्येच तयार होते. किडणीची कार्यक्षमता कमी होण्याने व किडणी निकामी होण्याने ह्या पदार्थांची निर्मिती कमी होते व पूर्णपणे बंदही होते. यामुळे लाल रक्ताची निर्मिती कमी होते आणि अॅनिमिया (रक्ताची कमतरता ) हा रोग होतो.
मजबूत हाडे : किडणी शरीरात सक्रीय असलेले 'ड' जीवनसत्व निर्माण करण्यास मदत करते. हे जीवनसत्व शरीरात कॅलशिअम आणि फॉस्फरसचे योग्य प्रमाण राखण्यात तसेच हाडे आणि दातांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी महत्वपूर्ण कार्य करते.
किडणीच्या रक्ताच्या शुद्धीकरणनंतर लाघवी कशी तयार होते? किडणी शरीराला आवश्यक ते पदार्थ शरीरात ठेवून अनावश्यक पदार्थ मूत्राद्वारे शरिरातून बाहेर टाकते. हि एक आगळीवेगळी, अद्भुत आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info