गरोदरपणात बदाम खावेत का?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 11:06

प्रेग्नंसीमध्ये कच्चे बदाम खावेत का?

गरोदरपणा स्त्रिया जो आहार घेत असतात त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे प्रेग्नंसीमध्ये स्त्रियांना कायमच सकस व पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यात खासकरुन पालेभाज्या, सुकामेवा, दूध यांचा आहारात समावेश केला जातो. विशेष म्हणजे गरोदरपणा भिजवलेले बदाम खाल्ले तर बाळावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो असं म्हटलं जातं. मात्र, अनेक स्त्रियांमध्ये बदाम खाण्याविषयी काही समज-गैरसमज आहेत. म्हणूनच, गरोदरपणा बदाम खावेत कि खाऊ नये याविषयी आज जाणून घेऊयात.

गरोदरपणा स्त्रियांनी कच्चे बदाम खाल्ले तर बाळाच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. कच्च्या बदामामध्ये आयरन, कॅल्शिअम, फॉलिक अॅसिड, फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे कच्चे बदाम खाणे फायद्याचं आहे. मात्र, जर स्त्रियांना बदाम किंवा अन्य सुकामेव्यातील पदार्थांची अॅलर्जी असेल तर त्यांनी हे पदार्थ खाऊ नये.

गरोदरपणात बदाम का खावेत?
रात्रभर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे त्यातून फायटिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत मिळते आणि त्यातील फॉस्फरस रिलीज होतो. ज्यामुळे हाडे बळकट होतात व पचनक्रियादेखील सुधारते.

मीठाच्या पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे एंजाइम रोखणारे तत्व नष्ट होता. व एंजाइम्स रिलीज होतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info