पोट साफ होत नाही काय करावे?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:16

पोट साफ होण्यासाठी घरगुती अन् उपाय प्रभावी, दैनंदिन जीवनात आताच करा बदल

अनेक आजारांचं मूळ पोटात असतं. म्हणजेच पोट साफ न होणं अनेक आजारांना आमंत्रण देतं. पित्त, गॅसेस, ढेकर, जळजळ अशा समस्या उद्भवतात, तसंच अपचनही होऊ शकतं. पोट साफ न होण्यासाठी (Constipation) चुकीच्या आहारपद्धती, पुरेसं पाणी न पिणं, व्यायामाचा अभाव, वेळेवर शौचाला न जाणं, चहा-कॉफीचं अतिरेकी सेवन व धूम्रपान या सवयी कारणीभूत असतात. नियमित पोट साफ न झाल्यास दिवसभर अस्वस्थ वाटतं व दिवस खराब जातो. त्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करता येऊ शकतात. सी. के बिर्ला रुग्णालयाच्या वेबसाईटवरील ब्लॉगमध्ये या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पोट साफ होत नसेल, तर अनेक लक्षणं (Symptoms) दिसू लागतात. त्यात सुरुवातीला गॅसेस व नंतर मलावरोध होऊ लागतो. पोट फुगणं, पोटात दुखणं ही याची मुख्य लक्षणं आहेत.

- गॅसेस होणं

- भूक मंदावणं

- दुर्गंधीयुक्त श्वासोच्छवास

- पोट जड झाल्यासारखं वाटणं

- पचनक्रिया खराब होणं

- मन अशांत होणं

- पोटात मुरडा येणं

- शौचाला घट्ट होणं

- नियमित शौचाला न होणं

- शौचावेळी जोर लावावा लागणं

पोट साफ होत नसेल, तर बेचैन वाटतं. त्यासाठी घरगुती उपाय करता येतात.

पुरेसं पाणी प्या

सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी प्यायलं, तर पोट साफ होऊ लागेल. हा उपाय नियमित केल्यास ही तक्रार कायमची बंद होईल. यासोबतच दिवसभरही पुरेसं पाणी (Drink Enough Water) प्यायलं पाहिजे. जेवल्यावर लगेचच पाणी पिऊ नये, त्यामुळे गॅसेस, मलावरोधाची समस्या उद्भवू शकते. यामुळेच अपचन व इतर आजारही निर्माण होतात.

हिंगाचा वापर

पोटाच्या समस्यांवर हिंग खूप प्रभावशाली आहे. कोमट पाण्यात थोडं हिंग घालून ते पाणी प्यायल्यास पोट साफ होतं.

वमन करणं

आयुर्वेदात वमन विधीबाबत बरंच सांगितलेलं आहे. पोट साफ होण्यासाठीचा हा प्रभावशाली उपाय आहे. रोज सकाळी उठल्यावर पोटभर पाणी प्या. काही मिनिटांनी घशात बोटं घालून उलटी काढा. यालाच वमन म्हणतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीचा हा चांगला उपाय आहे. मात्र लहान मुलांवर याचा प्रयोग शक्यतो करू नये. तसंच पहिल्यांदा वमन करणाऱ्यांनी कोणा तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनानं हा प्रयोग करावा.

योगासनं

मलावरोधामुळे पोट साफ न होण्याची समस्या असेल, तर काही योगासनांची (Yoga) मदत यासाठी घेता येईल. ताडासन, तिर्यक ताडासन, पश्चिमोत्तानासन, बंधासन, कटिचक्रासन, त्रिकोणासन ही आसनं केल्यावर मलावरोध कमी होऊ शकतो. यामुळे पचनाचं तंत्रही सुधारतं.

रुबर्ब

रुबर्ब वनस्पतीच्या पानांचा वापर पोट साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो. अनेक वर्षांपासून या पानांचा वापर आहारात व औषधांमध्ये केला जातोय. ही पानं पालकासारखी असतात. त्यांची चटणी करता येते. यामुळे गॅसेस, मलावरोध दूर होतो.

या उपायांशिवाय मध व लिंबाचा रस घालून कोमट पाणी, ओवा, सफरचंद, दही, अपल सायडर व्हिनेगर, कच्च्या भाज्यांचं सूप, जवस, तुळस आणि शहाळ्याचं पाणी या गोष्टीही पोट साफ करण्यासाठी मदत करतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1.पोट साफ होत नसेल, तर काय करावं?

पोट साफ होत नसेल, तर पुरेसं पाणी प्यायलं पाहिजे व आहारात बदल केला पाहिजे. सकाळी व संध्याकाळी नियमित व्यायाम (Exercise) केला पाहिजे. यामुळे फायदा झाला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

2.पोट साफ होण्यासाठी काय खावं?

पोट साफ होण्यासाठी हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables) आणि ताजी फळं खा. आहारात दही किंवा लस्सीचा समावेश करा. रोज रिकाम्यापोटी कोमट पाणी पिणं उत्तम असतं.

3.कोणतं फळ खाल्ल्यानं पोट साफ होतं?

पपई, सफरचंद, नासपती, संत्र, पेरू, किवी, आलुबुखार व लिंबू या फळांचं सेवन केल्यानं पोट साफ होतं.

आहारासोबतच व्यायाम व काही घरगुती उपाय करून पोट साफ न होण्याची समस्या दूर करता येते. हे उपाय नियमित केल्यास पोट साफ न होण्याची समस्या कायमची दूर होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यातून अनेक आजार उद्भवतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info