healthplanet.net

Posted on

प्रसुती नैसर्गिक होण्यासाठी जाणुन घ्या नऊ टिप्स :

प्रसूती कळा अर्थात लेबर पेन हे डिलिव्हरी होण्याचे संकेत असतात. गरोदरपणाच्या ३९ व्या किंवा ४० व्या आठवड्यात कधीही डिलिव्हरी होऊ शकते. पण काही स्त्रियांना नऊ महिने पूर्ण झाल्यावर किंवा डॉक्टरने सांगितलेल्या तारखे दरम्यान प्रसूती कळा सुरु होत नाही आणि कधी कधी ही चिंताजनक बाब असते. तर काही स्त्रिया वैयक्तिक कारणांमुळे लवकर डिलिव्हरी करू इच्छितात. अशावेळी स्त्रिया लवकर प्रसूती कळा येऊन डिलिव्हरी व्हावी म्हणून विविध उपाय करण्यावर भर देतात. पण एखादा चुकीचा उपाय हा आई व बाळ दोघांसाठी घातक ठरू शकतो. म्हणून याबाबत योग्य माहिती असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबतचा अगदी सुरक्षित आणि सोपा उपाय सांगत आहोत. हो तुम्ही काही पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला नैसर्गिकपणे प्रसूती कळा येऊ शकतात. हे अगदी सामान्य पद्धतीने आणि नैसर्गिकरित्या होत असल्याने यात धोका नसतो. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ जे स्त्रीला लवकर प्रसूती कळा येऊन डिलिव्हरी होण्यास मदत करतात.

अननस
अननस हे अनेकांचे आवडते फळ असते. पण ते फक्त चविष्ट नसून अनेक गुणधर्मांनी सुद्धा भरलेले असते. अननसामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि अँटीऑक्सीडेंटची मोठी मात्रा असते. यात ब्रोमलेन नावाचं एक एंजाइम सुद्धा असतं जे गर्भाशय ग्रीवा च्या भिंतींना मृदू करतं ज्यामुळे गर्भाशयात प्रसवासाठी संकुचन सुरु होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचे फायदे तर कळले पण हे अननस कसे खावे? तर गरोदर स्त्रीने हे अननस कापून खाल्ले तरी चालते किंवा ती त्याचा ज्यूस सुद्धा पिऊ शकते.

लसूण
लसणाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे अपचनावर अतिशय गुणकारी आहे. याशिवाय हे प्रसूती कळा सुरु करण्यास सुद्धा महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते. अधिक चांगले पचन व्हावे म्हणून रोज सकाळी लसूणाच्या दोन पाकळ्या खाव्यात. यामुळे मल बाहेर फेकले जाण्याची क्रिया नीट कार्य करेल आणि ज्यामुळे प्रसूती कळांसाठी गर्भाशयात संकुचन निर्माण होईल. लसूण हा आपल्या आहारातील प्रमुख पदार्थांपैकी एक असून आपल्या घरात नेहमी असतो. त्यामुळे आवर्जुन हा उपाय वापरून पहा.

रेड रास्पबेरीच्या पानांचा चहा
रास्पबेरीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात जे की गर्भाशयाच्या भिंतींमध्ये संकुचन निर्माण करण्यात मदत करतात. स्नायूंच्या संकुचनामुळे अर्भक हे गर्भाशयाच्या आत खालील बाजूस आपले डोके करतो. डिलिव्हरी साठी अर्भक या स्थितीत येणे गरजेचे असते. एक गोष्ट लक्षात ठेवा की गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यानंतरच रेड रास्पबेरीच्या पानांचा चहा करून प्या. जर तुम्हाला याबाबत पूर्ण माहिती नसेल आणि कोणती शंका असेल तर आपल्या डॉक्टरांचा आवर्जुन सल्ला घेऊनच याच्या सेवनाचा निर्णय घ्या.

एरंडेल तेल
एरंडेल तेलात सुद्धा लवकर प्रसव कळा सुरु करण्याची क्षमता असते. अनेक वर्षांपासून स्त्रिया प्रसव कळा येण्याकरता एरंडेल तेलाचा वापर करत आहेत. आयुर्वेदात सुद्ध याचे दाखले दिले आहेत. त्यामुळे बिनधास्त होऊन गरोदर स्त्री एरंडेल तेलाचा वापर करू शकते. पण याचा वापर हा मर्यादित प्रमाणातच करावा कारण हे खूप शक्तिशाली तेल असून याचे उलट परिणाम झाल्यास उलटी आणि अतिसार होऊ शकतो. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेऊनच एरंडेल तेलाचे सेवन करावे.

खजूर
एका छोट्या संशोधनात हे आढळून आले आहे की ज्या स्त्रिया नवव्या महिन्यात रोज ६ खजूर खातात त्यांच्या प्रसव कळा नैसर्गिकपणे सुरु होण्याची शक्यता असते. एवढचं नाही तर डिलिव्हरी जवळ आल्यास गर्भाशय ग्रीवा स्वत:हून उघडू लागते. लवकर प्रसूती कळा सुरु करण्यात हे सर्व घरगुती उपाय गरोदर स्त्रीला उपयुक्त ठरतात. कधी कधी गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात काही समस्यांमुळे प्रसूती कळा सुरु होत नाहीत. या स्थितीत डॉक्टर औषधे देऊन प्रसूती कळा आणतात किंवा सिजेरीयन डिलिव्हरीचा सल्ला देतात. परंतु हे सगळे पदार्थ नैसर्गिकरित्या प्रसूती कळा आणतात. याशिवाय या पदार्थांचे इतर सुद्धा फायदे असल्याने एकंदर पाहता या पदार्थांचा वापर सुरक्षित ठरतो.



नियमित व्यायाम करा-
जर तुम्हाला नियमित व्यायाम करण्याची सवय नसेल तर गरोदरपणात मात्र तुम्ही तो करायलाच हवा.नियमित व्यायाम केल्यामुळे सुलभ प्रसुती होऊ शकते. व्यायामामुळे तुमचे ओटीपोट व मांडीचे स्नायु बळकट होतात.हे स्नायु बळकट नसल्यास प्रसुतीकळांचा ताण ते सहन करु शकत नाहीत व त्यामुळे डॉक्टर त्वरीत सी-सेक्शन (सिझेरियन डिलीवरी) करण्याच्या सल्ला देतात.यासाठी शरीराच्या कंबरेखालील भागांना बळकट करणारे व्यायाम प्रकार करण्याचा सराव करा.जर तुम्हाला या दिवसांमध्ये व्यायाम कसा करावा हे माहीत नसेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांचा किंवा प्रसुतीपुर्व प्रशिक्षण देणा-या तज्ञांचा सल्ला घ्या. जयापाली शेट्टी,हिप्नोबर्थिंग प्रॅक्टिश्नर,मुंबई यांच्या मते जर गरोदरपणात तुम्ही चुकीचा व्यायाम केला तर तुम्हाला व तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो.

ताण-तणावापासून दूर रहा-
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण हा प्रत्येकाला येतोच.मात्र गरोदरपणात प्रयत्नपूर्वक ताण टाळण्याचा प्रयत्न करा.सरावाने मन प्रसन्न ठेवता येते.या सरावाचा प्रसुती दरम्यान तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.ताण तुमच्या शरीरातील ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन कमी करतो जे सुलभ प्रसुतीसाठी अत्यंत आवश्यक असते.ताणामुळे प्रसुती होण्यास वेळ लागतो त्यामुळे ती त्रासदायक देखील होते.प्रसुती दरम्यान आलेला ताण हा बाळ व आई या दोघांच्याही जीवासाठी धोकादायक असतो. प्रसुती दरम्यान येणारा ताण सहन करण्यासाठी आधीच तयारी करायला हवी.

योग्य रितीने श्वास घेण्याचा सराव करा.

सुयोग्य पद्धतीने घेतलेला श्वास ताणतणाव दुर करतो,शरीरामध्ये ऊर्जा वाढवतो आणि बाळाची योग्य वाढ करण्यास मदत करतो.सुयोग्य पद्धतीने घेतलेला श्वासामुळे शरिराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळते व त्यामुळे बाळाची शारिरिक व मानसिक वाढ चांगली होते. सहाजिकच तुमचे बाळ प्रसुती दरम्यान सुखरुप बाहेर येते.

इतरांच्या भयानक अनुभवांपासून स्वत: ला दूर ठेवा-
‘ब-याच स्त्रीयांना त्यांच्या आयुष्यात प्रसुती दरम्यान आलेले बरे-वाईट अनुभव गरोदर महिलांना सांगण्याची सवय असते.अशा महिलांपासून दूर रहा.हे भयानक अनुभव प्रसुती दरम्यान तुमच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण करु शकतात.ज्यांचा परिणाम थेट तुमच्या प्रसुतीवर देखील होऊ शकतो.’

सकस आहार घ्या-
तुम्ही काय खाता याचा तुमच्या गरोदरपणावर,प्रसुतीवर व बाळाच्या जन्मावर परिणाम होत असतो.गरोदरपणात तेला-तुपाचे पदार्थ खाल्याने बाळंतपण सुलभ होते हा एक गैरसमज आहे.त्यामुळे असाच पौष्टिक आहार घ्या ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होईल व गर्भ चांगल्या रितीने पोसला जाईल जर आईची प्रकृती सुदृढ असेल तर ती प्रसुतीवेदना सहज सहन करते सहाजिकच तिची प्रसुती नैसर्गिक होते.गरोदरपणात घेतलेल्या चांगल्या आहारामुळे गर्भाचेही पोषण उत्तम झाल्याने प्रसुती दरम्यान बाळ योग्य रितीने बाहेर येण्यास मदत होते.’मात्र यासाठी तुमचे वजन नियंत्रित ठेवा.कारण जास्त वजनामुळेही तुमची नैसर्गिक प्रसुती होणे कठीण होऊ शकते.

गरोदरपण व प्रसुती याबाबत योग्य माहिती मिळवा -
नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रसुतीविषयी योग्य व अचूक माहीती मिळवणे गरजेचे आहे.यासाठी गर्भसंस्कार वर्ग,प्रसुतीपुर्व घेण्यात येणारे प्रशिक्षण वर्ग यामध्ये सहभाग घ्या.

लेबररुम मध्ये तुमच्या सोबत तुमची जवळची व्यक्ती असू द्या
लेबर रुममध्ये तुमच्यासोबत तुमचे पती किंवा घरातील जवळची व्यक्ती असणे गरजेचे आहे. ‘भावी आईसोबत तिचा पती किंवा जवळची व्यक्ती असल्यास तिला एक प्रकारे मानसिक व भावनिक आधार मिळतो.ज्यामुळे तिचा ताण कमी होऊन सुलभ प्रसुती होण्यास मदत होते.’

चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर तुम्हाला त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसेल तर त्वरीत दुस-या डॉक्टर किंवा प्रसुतीगृहात जाण्याचा निर्णय घ्या जिथे सर्वात आधी नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रयत्न केले जातात.’ चांगला डॉक्टर शोधण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाच्या जन्माविषयी एक योजना तयार करा व डॉक्टरशी चर्चा करा.जर ते याबाबत तुमच्या भावनांचा आदर करीत नसतील तर तुम्ही इतर तज्ञांचा सल्ला घेण्यास तयार व्हा.

योनीमार्गाला नियमित मसाज करा.
सातव्या महिन्यानंतर योनिमार्गाला केलेला मसाज तुमचा ताण कमी करु शकतो.तसेच यामुळे स्नायुंवरील सूज व वेदना कमी होते.यासाठी तुमच्या योनीजवळील अवयवांना हलक्या हाताने मसाज करा.या मसाजचा तुम्हाला बाळंतपणात होणा-या वेदनेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info