Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
रक्त लाल असूनही नसा हिरव्या-निळ्या का दिसतात? 99% लोकांना देता येणार नाही याचं उत्तर
मानवी शरीर ( human body ) सर्वात जटिल (Complex) असून यामध्ये अनेक रहस्ये ( secrets ) दडलेली आहेत. अशी काही रहस्ये आहेत, जी जाणून घेतल्यास तुम्हाला आर्श्चय वाटेल. अनेकदा काही छोट्याछोट्या गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर ( eyes ) असतात, पण त्यानंतरही तुम्ही त्यांचा बऱ्याचवेळा बारकाईने विचार केला नसेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला माहीत असेलच की, मानवी शरीरात वाहणारं रक्त लाल रंगाचं (Real Colur Of Blood) असतं. हे रक्त मानवी शरीरातील नसांमधून ( veins ) वाहतं, म्हणजेच शरीरातील शिरा रक्त वाहून नेणाऱ्या पाईपचं काम करतात.
रक्तवाहिन्यांमध्ये लाल रंगाचं रक्त वाहतं, मात्र नसांचा रंग हिरवा किंवा निळा ( green or blue ) कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. साधारणपणे, एखाद्या पारदर्शक नळीमधून, वस्तूमधून ज्या रंगाचा द्रव वाहतो, त्याचा रंग बाहेरून तसाच दिसतो. अशा स्थितीत नसांचा रंगही लाल दिसायला हवा. पण तसं होत नाही. मानवी शरीराच्या शिरा एकतर निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात. याचं नेमकं कारण काय आहे, याबाबत आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत.
म्हणून असतो रक्ताचा रंग लाल-
मानवी रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिनमुळे असतो. यामध्ये 'हिम' नावाचा घटक शरीरात रक्त वाहून नेतो. हे शरीराच्या अवयवांना ऑक्सिजनदेखील पोहोचवते. बऱ्याच लोकांचे मत आहे की, रक्ताचा रंग हिरवा असतो. पण शरीरातून बाहेर पडल्यावर तो लाल होतो. शरीरातील नसांमध्ये ऑक्सिजन नसतो. यामुळे त्याचा रंग हिरवा असतो. तर रक्त शरीराच्या बाहेर येत असताना त्यात ऑक्सिजन मिसळतो, आणि त्याचा रंग लाल होतो. पण विज्ञान हे चुकीचे असल्याचे सिद्ध करते.
विज्ञानानुसार नेमकं कारण काय?
विज्ञानानुसार रक्ताचा हिरवा रंग रक्तवाहिनीच्या आत असतो, हे म्हणजे एक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन आहे, म्हणजेच एक भ्रम आहे. खरं तर निळ्या रंगाचा प्रकाश लाल रंगाच्या तुलनेत स्वतः टिश्यूमध्ये खूप खोलीपर्यंत प्रवेश करत नाही, ज्यामुळे त्यांच्यात रंग परावर्तित करण्याची क्षमता जास्त असते. याउलट, लाल रंगाची किरणं आत जाण्यास सक्षम असतात आणि त्यातील काही भागच परावर्तित होऊन बाहेर दिसतो. यामुळेच रक्तवाहिन्यांमध्ये रक्त लाल रंगाऐवजी हिरवे किंवा निळे दिसते.
मानवाच्या शरीरात अनेक अशी रहस्य असतात, ज्याबाबत तुम्हाला माहिती नसेल. रक्ताचा रंग लाल असताना नसांचा रंग वेगळा का दिसतो, असाही प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. याबाबत विविध कारणंही तुम्ही ऐकली असतील. पण त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घेणं गरजेचं आहे.
| --------------------------- | --------------------------- |