गर्भाशय चे वजन किती असते?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 10:29

गर्भातील बाळाचं वजन किती असायला हवं?
बाळ गर्भात असताना त्याची योग्य रितीने वाढ होते आहे की नाही? या गोष्टीचा अंदाज त्याच्या वजनावरुन आपण घेऊ शकतो. तर बाळाचे वजन कमी असल्यास प्रेग्नेंसीमध्ये अडचण येऊ शकते आणि बाळाच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. म्हणून जाणून घ्या गर्भातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स!
असं म्हणतात की बाळाचं वजन जितकं जास्त असेल तितकं बाळ सुदृढ आणि निरोगी असतं आणि जितकं बाळाचं वजन कमी तितकं त्या बाळाला जपावं लागतं. बाळचं वजन हे आईच्या वजनावर अवलंबून असतं. गरोदरपणात आई जितकी सुदृढ असते तितकंच बाळ सुदृढ असतं. पण ही गोष्ट कितपत खरी आहे? कारण गरोदरपणात स्त्रीचं वजन जास्त नसलं पाहिजे असं तज्ञ सांगतात आणि न ते खूप कमी असावं. मग आता तुम्ही म्हणाल मग काय असावं स्त्रीचं व बाळाचं गरोदरपणातील वजन? जेणेकरून बाळ अगदी सुखरूप राहील. तर मंडळी आज तीच गोष्ट या विशेष लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत काय असावं गर्भातील अर्भकाचं योग्य वजन!
गर्भातील बाळाचे वजन किती असावे?

आठवड्यांनुसार अर्भकाचे वजन पुढील प्रकारे असायला हवे.

8 व्या आठवड्यामध्ये 1 ग्रॅम, 9 व्या आठवड्यामध्ये 2 ग्रॅम, 10व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 11 व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 12 व्या आठवड्यामध्ये 14 ग्रॅम, 13 व्या आठवड्यामध्ये 23 ग्रॅम, 14 व्या आठवड्यामध्ये 43 ग्रॅम, 15 व्या आठवड्यामध्ये 70 ग्रॅम, 16 व्या आठवड्यामध्ये 100 ग्रॅम, 17 व्या आठवड्यामध्ये 140 ग्रॅम, 18 व्या आठवड्यामध्ये 190 ग्रॅम, 19 व्या आठवड्यामध्ये 240 ग्रॅम, 20 व्या आठवड्यामध्ये 300 ग्रॅम, 21 व्या आठवड्यामध्ये 360 ग्रॅम, 22 व्या आठवड्यामध्ये 430 ग्रॅम, 23 व्या आठवड्यामध्ये 501 ग्रॅम, 24 व्या आठवड्यामध्ये 600 ग्रॅम, 25 व्या आठवड्यामध्ये 660 ग्रॅम, 26 व्या आठवड्यामध्ये 760 ग्रॅम, 27 व्या आठवड्यामध्ये 875 ग्रॅम, 28 व्या आठवड्यामध्ये 1005 ग्रॅम, 29 व्या आठवड्यामध्ये 1153 ग्रॅम, 30 व्या आठवड्यामध्ये 1319 ग्रॅम, 31 व्या आठवड्यामध्ये 1502 ग्रॅम, 32 व्या आठवड्यामध्ये 1702 ग्रॅम, 33 व्या आठवड्यामध्ये 1918 ग्रॅम, 34 व्या आठवड्यामध्ये 2146 ग्रॅम, 35 व्या आठवड्यामध्ये 2383 ग्रॅम, 36 व्या आठवड्यामध्ये 2622 ग्रॅम, 37 व्या आठवड्यामध्ये 2859 ग्रॅम, 38 व्या आठवड्यामध्ये 3083, 39 व्या आठवड्यामध्ये 3288 आणि 40 व्या आठवड्यामध्ये 3462 ग्रॅम इतके अर्भकाचे वजन असणे गरजेचे आहे. .

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info