गर्भधारणेसाठी शुक्राणूंची संख्या किती आवश्यक आहे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 11:47

वैद्यकीय नियमांनुसार गर्भधारणेसाठी एक मिलीलीटर वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या २०-११० लाख असणे आवश्यक आहे आणि त्यांची गतिशीलता ४० टक्क्यांपर्यंत असणं पुरेसे आहे.

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी वीर्यस्खलनाची लांबी (The length of ejaculation)आणि त्याचा शुक्राणूंवर होणारा परिणाम (Effect on sperm) यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ एंड्रोलॉजी आणि युरोपियन अकॅडमी ऑफ एंड्रोलॉजीचे अधिकृत जर्नल अँड्रॉलॉजीमध्ये 1 जुलै रोजी या अभ्यासाची नोंद करण्यात आली आहे.

2 ते 3 दिवसांचे अंतर ठेवा

असे मानले जाते की, दीर्घकाळ (इजैक्‍युलेशन)स्खलन होण्यापासून दूर राहिल्याने वीर्यामधील शुक्राणू पेशींची संख्या वाढते, परंतु प्रजनन तज्ञांनी गर्भधारणेसाठी प्रयत्नशील लोकांना दोन संबधां दरम्यान 2 ते 3 दिवसांचे आदर्श अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संभोगाच्या दरम्यान खूप कमी अंतर ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते.
गर्भधारणेसाठी प्रयत्नशील असाल तर

या अभ्यासासाठी, दोन वीर्यस्खलन आणि 10,000 पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेतील अंतराचे मूल्यांकन करण्यात आले. त्याच्या परिणामात असे आढळून आले की, जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर शुक्राणूंच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, सरासरी गुणवत्तेचे शुक्राणू असलेल्या पुरुषांनी दोन स्खलन दरम्यान दोन दिवसांचे अंतर ठेवावे. दुसरीकडे, ज्या लोकांच्या शुक्राणूंची गुणवत्ता खूपच खराब आहे, त्यांनी ती सुधारण्यासाठी दोन स्खलन दरम्यान 6 ते 15 दिवसांचे अंतर ठेवावे.
50 टक्के वंधत्वाचे कारण पुरुष

कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्लिनिकल भ्रूणविज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. सतीश अडिगा यांनी सेंटर ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड एंड्रोलॉजी, म्युएन्स्टर, जर्मनी यांच्या सहकार्याने मणिपालमधील या अभ्यासादरम्यान टीमचे नेतृत्व केले. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (डॉ.) वेंकटेश म्हणाले, “वंध्यत्व ही महिलांची समस्या म्हणून पाहिली जाते. परंतु भारतात असे आढळून आले आहे की, जवळजवळ 50 टक्के वंध्यत्वाचे कारण पुरुष घटक आहे.” बहुतेक प्रकरणांमध्ये हे, शुक्राणूंच्या खराब गुणवत्तेमुळे होते. व्यंकटेश पुढे म्हणाले की आमचा नवीन अभ्यास अशा लोकांना मदत करेल जे वारंवार अपत्यप्राप्तीमध्ये अपयशी ठरतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info