वजन कमी का होते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 13:55

तुमचे वजन अचानक कमी होत आहे का?, त्यामागे असेल हे मोठं कारण!

Weight Loss : कोणत्याही कारणाशिवाय सतत वजन कमी होणं हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. म्हणूनच तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे वजन अचानक कमी झाले असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा.


Weight Loss : वाढत्या वजनामुळे (Weight Gain) अनेक जण त्रस्त असतात. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी ते बरेच प्रयत्न करतात. कधी डाएट (Diet) करतात, व्यायाम (Exercise) करतात, योगा (Yoga) करतात. पण जर तुम्ही काहीही न करता तुमचे वजन अचानक कमी होत असेल तर कदाचित तुम्हाला आनंद होईल. पण जेव्हा असे घडते तेव्हा आनंदी न होता तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.

कोणत्याही कारणाशिवाय सतत वजन कमी होणं हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. म्हणूनच तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला वजन कमी होण्यामागे नेमकं काय कारण असू शकते? हे जाणून घेणार आहोत. पण जर तुमचे वजन अचानक कमी होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करुन चालणार नाही.
अचानक वजन कमी होण्यामागे ही कारणे असू शकतात –
मधुमेह (Diabetes) –

जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तरच वजन कमी होते. जेव्हा शरीरातील साखरेची पातळी गरजेपेक्षा जास्त वाढू लागते, तेव्हा त्याचा परिणाम वजनावर होतो. यामध्ये प्रथम व्यक्तीचे वजन वाढते आणि तो लठ्ठ झाला तर त्याचा परिणाम वजनावर होतो. यानंतर, साखरेची पातळी वाढल्यानंतर, वजन पुन्हा कमी होऊ लागते. कारण साखर फक्त रक्तातच राहते आणि ती पेशींपर्यंत पोहोचत नाही. यामुळे तुम्ही अशक्त होतात आणि बारीक होत जाता.
कर्करोग (Cancer) –

आजच्या काळात कर्करोग हा खूप गंभीर आजार झाला आहे. त्याची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. या लक्षणांपैकी एक म्हणजे वजन कमी होणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्करोग होतो तेव्हा त्याचे वजन खूप वेगाने कमी होऊ लागते. असे घडते कारण जेव्हा शरीर कर्करोगाशी झुंज देत असते तेव्हा शरीरातील पौष्टिक घटक संसर्गाशी लढू लागतात आणि तुमचे वजन कमी होऊ लागते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info