लहान मुलांना लाळ का येते?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:24

6 ते 8 महिने बाळाला दात येत नाहीत परंतु याची प्रक्रिया 3 महिने वयापासूनच सुरु होते. म्हणून 3 महिन्याच्या बाळाच्या तोंडून लाळ गळण्यास सुरुवात होते. दात आल्यावर लाळ जास्त गळायला सुरुवात होते. जर बाळाला जास्त वेळ तोंड उघडे ठेवण्याची सवय असेल तरी सुद्धा त्याच्या तोंडून लाळ गळू शकते. जर बाळ कोणत्या पदार्थावर लक्ष केंद्रित करत असेल आणि त्याचा मेंदू उत्तेजित होत असेल तर त्यामुळे जास्त सलाईवा तयार होते आणि बाळाला सलाईवाला गिळायचे असते हे माहित नसते. याच कारणामुळे बाळाची लाळ गळू लागते.
जास्त लाळ गळणे

लाळ गळण्याच्या नॉर्मल वयानंतर बाळाच्या तोंडात जास्त सलाईवा तयार झाल्यावर बाळाची जास्त लाळ गळू शकते. जर दोन वर्षे वयानंतर सुद्धा बाळाची लाळ गळत असेल तर तुम्हाला डॉक्टरला एक समस्या म्हणून ही गोष्ट दाखवायला हवी. जास्त सलाईवा तयार झाल्यावर तोंड आणि जिभेच्या खराब ताळमेळा मुळे सुद्धा लाळ गळू शकते. याचा ताळमेळ सध्या न झाल्यास बाळ सलाईवा गिळू शकत नाही. अशा स्थितीमध्ये जाणकारांचा सल्ला घेणे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे योग्य ठरते. ही गंभीर समस्या नसून योग्य उपचारांनी बरी होऊ शकते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info