रोज किती पावले चालले पाहिजे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 16:02

आजकाल आपल्याला सर्रास ऐकू येते की मी इतके इतके किमी रोज चालते, इतकी पावले चालतो. लोक स्वतःच्या आरोग्यबाबत आता जागरूक झालेले दिसून येतात पण नेमके किती वेळ चालावे अथवा किती किती किमी चालावे ह्यात काही लोक संभ्रमात आहेत.चालायच्या बाबतीती अनेक लोकांची वेगवेगळी मते आहेत जगभरात अनेक संशोधनं झालेली आहेत त्यावरून एकच निष्कर्ष निघतो कि जितके चालला तितके आरोग्यसाठी चांगलेइतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज तुम्ही चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही.

नक्की किती चालावे?

साधारणपणे रोज तीस मिनिटे चालल्यास २०० कॅलरी बर्न होतात. एकट्याने चालणे कंटाळवाणे वाटत असल्यास मित्र-मैत्रिणीसोबत चालण्यास सुरुवात करावी. सुरुवातीला कमी वेळ आणि अंतर चालून, हळू हळू सकाळ-संध्याकाळ ३० मिनिटे चालायला सुरुवात करणे फायदेशीर असते.
वेळ कमी असल्यास घरच्या घरी किंवा सोसायटीमध्ये रात्री जेवल्यानंतर किंवा सकाळी अर्धा तास तरी चालावे. अ‍ॅपच्या साहाय्याने रोज किती चालतो हे मोबाइलवर किंवा पेडोमीटरवर तपासण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे. त्याचा योग्य वापर करता येईल.१६ ते १७ वयोगटातील मुलामुलींसाठी कमीत कमी १२ हजार ते १५ हजार पावले चालणे आवश्यक आहे. १८ ते ४० वयोगटातील पुरुषांनी दररोज १२ हजार पावले आणि महिलांनी देखील निदान तेवढीच पावले चालणे आवश्यक आहे.४० ते ५० वयोगटातील पुरुष आणि महिलांनी कमीतकमी दिवसातून ११ हजार पावले तरी चालले पाहिजे.सर्वसामान्य प्रौढांवर अजूनही अभ्यास करण्यात आलेला नाही त्यामुळे त्यातला त्यात एक सुवर्णमध्य आपण काढू शकतो की शक्यतो दिवसाला ६ ते ८ हजार पावले चालणे गरजेचे आहे.


फायदे :

१) हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू राहते, रक्ताभिसरण सुधारते व रक्तदाब नियंत्रणात राहतो.

२) वाढत्या वयात आपले स्नायू कमकुवत होतात. चालण्याने या स्नायूमध्ये अधिक ताकद येते. हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो.

३) रोजच्या चालण्याने पचनशक्तीदेखील सुधारते. जेवल्यानंतर शतपावली करण्याचे हेच कारण आहे.

४) चालण्याने फुप्फुसाची क्षमता वाढते. शरीराला अधिक प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तुमची कार्यक्षमता वाढते.

६) चालण्याने मेंदू व मज्जासंस्था तणावरहित होतात. विचारांना चालना मिळते. स्मृतिभ्रंश व वृद्धत्व अशा आजारांची बाधा शक्यतो होत नाही.

७) चालण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते जेणेकरून आजारांशी सामना करणे सोपे जाते.
नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला होणारा पुरवठा होतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info