दह्यासारखा पांढरा स्त्राव कधी होतो?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 11:42

गरोदरपणाच्या काळात योनिमार्गातून स्त्राव होणं

गरोदरपणाच्या काळात दिवसेंदिवस जसा काळ पुढे सरकतो. तशी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. गरोदरपणाच्या काळात शरीरातून पांढरे पाणी बाहेर टाकले जाते. शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. या काळात पेल्व्हिक भागाला होणारा रक्तपुरवठाही अधिक असतो. त्यामुळे पांढर्‍या रंगाचा गंध रहित स्त्राव वाहतो. मात्र हा स्राव करडा किंवा पिवळसर रंगाचाआढळल्यास ते इंफेक्शन असू शकते. त्यामुळे गरोदरपणाच्या काळात कोणत्याही प्रकारचे स्त्राव आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1. पांढर्‍या रंगाचे गंध विरहीत स्त्राव : गरोदरपणाच्या काळात शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने पांढर्‍या रंगाचा स्त्राव होतो. अशा स्वरूपाचा स्राव होणे सामान्य आहे. हा स्राव होणे म्हणजे योनीमार्गातील शुष्कता नसल्याचे संकेत देतात. यामुळे योनिमार्गाजवळ जळजळ,खाज येण्याचा त्रास होत नाही.
2. करड्या रंगाचा स्राव : गरोदरपणाच्या काळात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे शरीरात बॅक्टेरिया साचून राहण्याचे प्रमाण वाढते. अति प्रमाणात बॅक्टेरिया साचल्यास चांगले आणि घातक बॅक्टेरिया या मधील संतुलन बिघडते. परिणामी यामधून काही इंफेक्शन निर्माण होते. या समस्येला बॅक्टरिअल वाजिनोसिस म्हणतात. अशाप्रकारचा स्त्राव आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. पांढरा- पिवळसर स्त्राव : योनिमार्गामध्ये यिस्ट इंफेक्शन असल्यास पांढरा- पिवळसर रंगाचा स्त्राव वाहतो. बॅक्टेरियाप्रमाणेच योनिमार्गामध्ये कॅण्डिडा नामक यीस्ट आढळतात. मात्र शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या निर्मितीचे प्रमाण वाढल्यास या यीस्टची देखील वाढ होते. परिणामी पिवळसर रंगाचा स्त्राव वाहतो. या स्त्रावासोबत जळजळ, खाज, वेदना वाढल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. रक्त पडणे : हा एक महत्त्वाचा संकेत आहे. तुम्ही गरोदर असल्यास स्पॉटिंगच्या 10-15 दिवसांनंतर इम्प्लांटेशन ब्लीडींग होते. त्यामुळे तुम्ही गरोदर असल्याची खात्री करून घ्या.

पांढरे पाणी जाणे हे एक लक्षण आहे. प्रदर म्हणजे अंगावरून जाणे. श्वेत म्हणजे पांढरे. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे. (रक्तप्रदर म्हणजे अंगावरून रक्त जाणे.) पण बोली भाषेत रक्त नसलेल्या अनेक स्रावांना-श्वेतप्रदर-अंगावरून पांढरे पाणी जाणे, असेच म्हणतात. स्रावांचा रंग पाण्यासारखा पांढरट किंवा पिवळसर असू शकतो. काही आजार नसतानाही असे पाणी जाऊ शकते. ही तक्रार ब-याच स्त्रिया करतात. याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

पाणी जाण्याची कारणे
1. वयात येणे, गरोदरपण, स्त्रीबीज सुटताना पाझर, इत्यादी सामान्य शारीरिक कारणे. यात आजाराचा संबंध नसतो.
2. गर्भाशय, गर्भनलिका, इ. अंतर्गत अवयवांच्या आजारांमुळे (जंतुदोष, कर्करोग, इ.) होणारे पाझर.
3. निरनिराळया जंतुदोषांमुळे होणारे योनिदाह (बुरशी, जिवाणू, ट्रायकोमोनास, परमा,इ.)
4. मधुमेहामुळे होणारा जंतुदोष
5. पांढ-या पाण्याच्या तक्रारींमागे किती विविध प्रकारची कारणे असतात हे यावरून लक्षात येईल. पाणी जाणे म्हणजे केवळ योनिदाह आहे म्हणून उपचार करून सोडू नये. रोगनिदान आणि योग्य सल्ला जास्त महत्त्वाचे आहेत.

जिवाणूबदल आणि पांढरे पाणी योनिमार्गात नेहमी काही सहजिवाणू वस्तीला असतात. यांच्यामुळे आम्लता होऊन सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. हे जिवाणू प्राणवायू पण सोडतात, त्यामुळे इतर जंतू मरतात. मात्र काही कारणांनी हे सहजिवाणू कमी होऊन इतर प्रकारचे नवे जंतू शिरून वाढू शकतात. यामुळे खरे म्हणजे योनीदाह होत नाही, केवळ पाझर वाढतात. खाज किंवा आग होत नाही. हे जंतू लिंगसांसर्गिक पध्दतीने पसरत नाहीत. असे जंतू असलेल्या निम्म्या स्त्रियांना फारसा त्रास पण होत नाही. या पाहुण्या जंतुंमुळे होणारा पाझर - पांढरट, दुधाळ, पातळ व योगिमार्गात त्वचेला लागून आढळतो. याला मासळीसारखा वास असतो आणि हा अल्कली गुणधर्माचा असतो.(लिटमस टेस्ट केल्यास तांबडा लिटमस निळा होतो) यामुळे फारच झाले तर योनिद्वाराशी सौम्य खाज असू शकते. यासाठी सोपा उपचार म्हणजे क्लिंडामायसीन मलम आतून लावणे. याऐवजी क्लिंडामायसीन नावाच्या योनीमार्गात बसवायच्या गोळया मिळतात. ही गोळी झोपताना रोज एक योनिमार्गात ठेवणे हा एक पर्याय आहे. आणखी पर्याय म्हणजे लक्टील नावाचे एक मलम 7 दिवस रोज आतून लावल्यास योनिमार्गात आम्लता निर्माण होते व जंतूंची वाढ थांबते. मात्र उपचार थांबवल्यावर काही जणींना हा त्रास परत होण्याची शक्यता असते.

योनीदाह आणि अंगावरून पांढरे जाणे
अंगावरून पांढरे जाणे ही बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते. काही वेळा हा आजार असतो तर काही वेळा आजारनसतो. निरोगी अवस्थेत योनीमार्गात रहिवाशी जिवाणूंमुळे लॅक्टीक आम्ल असते. या आम्लामुळे इतर जिवाणू व जंतू वाढू शकत नाहीत. सामान्यपणे पांढरे पाणी गर्भाशय मुखातील ग्रंथीतून किंवा योनीमार्गातील ग्रंथीतून पाझरते. या स्त्रावामुळे योनीमार्ग आपोआप स्वच्छ आणि रोगजंतूरहित राहतो. सामान्यपणे हे स्त्राव कमीअसल्याने लक्षात येत नाहीत. स्त्राव जास्त असेल तर त्याची तक्रार होते. पांढरे पाणी जाण्याची तक्रार कोणत्याही वयात आढळते. म्हातारपणातही हा त्रास होऊ शकतो. आता आपण या जिव्हाळयाच्या त्रासाबद्दल माहिती घेऊया.

योनीमार्गातले नैसर्गिक स्त्राव :
स्त्रीबीज सुटताना, शरीर संबंधात किंवा गरोदरपणात निसर्गत: पाझर वाढतात. यामुळे आपोआप स्वच्छता राहते आणि रोगजंतू वाहून जातात. काही स्त्रियांना चक्क कपडाही वापरावा लागतो. पण हे पाणी स्वच्छ असेल, घाण वास नसेल आणि वेदना नसेल तर काळजी करू नका.

अंगावरून रोगट स्त्राव :
पांढऱ्या पाण्याबरोबर दुर्गंध, तांबूस पिवळी किंवा हिरवी छटा, ताप, ओटीपोटात वेदना असेल तर हा आजार असतो. यापैकी काही लिंगसांसर्गिक आजारपण असू शकतात. रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गात आम्लता घटल्याने रोगजंतू वाढू लागतात. इथे अशा काही आजारांची माहिती दिली आहे.
- खराब रोगट गर्भाशयमुख : यामुळे सौम्य वेदना आणि सळसळ-खाज जाणवते. शरीरसंबंधांच्या वेळी विशेष त्रास होतो. स्त्राव तांबूस असतो. उपचारांनी हा आजार बरा होतो.
- योनीमार्गात रोगजंतू वाढून दुर्गंधयुक्त हिरवट स्त्राव आणि खाज येते.
- योनीमार्गात बुरशीलागण होऊन दह्यासारखा स्त्राव आणि खाज येते. योनीमार्गाचा अंतर्भाग लालभडक दिसतो. बुरशीरोधक गोळी योनीमार्गात 2-3 दिवस ठेवा. याने हा त्रास कमी होतो.
- एकपेशीय योनीदाह : यात हिरवट स्त्राव येतो. योनीमार्गात आत लालसर ठिपके दिसतात. हे स्वत: प्रत्येक स्त्रीला आरशाने तपासता येते. यासाठीपण योनीमार्गात गोळी ठेवावी लागते.
- परमा : हा लिंगसांसर्गिक आजार झाल्यावर योनीमार्गात वेदना, पिवळट पू,ताप आणि लघवीला जळजळ होते. जोडीदारालापण हा त्रास आधी असू शकतो किंवा नंतर होतो.
वेळीच उपचार न केल्यास हे दुखणे ओटीपोटात जाऊ शकते.
- ओटीपोटातील जंतूलागण : ओटीपोटात म्हणजे जननसंस्थेत जंतूलागण झाल्यामुळे ताप, दुखणे, दुर्गंधयुक्त स्त्राव हा त्रास होतो. वेळीच उपचार न केल्यास कायमचे दुखणे होते. पुढेपुढे गर्भनलिका सुजून वंध्यत्व येऊ शकते. लैंगिक संबंधावेळी ओटीपोटात दुखणे ही याची विशेष खूण आहे.
- अधर्वट किंवा दुषित गर्भपात झाल्यास तांबूस आणि दुर्गंधयुक्त पाणी येते,ताप आणि वेदना होतात. त्यासाठी ताबडतोब उपचार घ्यावे लागतात.
- गर्भाशयमुखाचा कर्करोग असल्यास स्त्राव तांबूस किंवा लाल येतो. यावर जंतूलागण झाल्याने दुर्गंध आणि पूमिश्रित पाणी येते.

प्राथमिक आणि वैद्यकीय उपचार
- नैसर्गिक स्त्राव असेल तर काळजीचे कारण नसते. स्वच्छता मात्र पाळावी.
- केवळ योनीदाह असेल तर योनीमार्गात ठेवण्याच्या गोळयांचा उपचार पुरतो. आवश्यक वाटल्यास तोंडाने एफ.एस.ए.3 या गोळयांचा उपचार करावा. वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.
- लिंगसांसर्गिक आजाराची शक्यता वाटल्यास वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यावा.
- स्त्राव तांबूस असेल तर वेळीच तपासणी करायला पाहिजे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info