ताप आल्यावर काय खावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 12:28

जाणून घ्या अंगात ताप असताना काय खाल :

भरपूर सूप प्या

ताप असताना सूप पिणे हे सर्वात चांगले असते. यातल्या पोषक तत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच ताप कमी होण्यासही लवकर मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो.

बेसनाचा शिरा

बेसनाच्या शिऱ्याचा सर्दी, खोकला, ताप अशा आजारांमध्ये खूप फायदा होतो. बेसनाच्या शिऱ्यामुळे घशातली खवखव आणि नाक चोंदण्याची समस्या दूर होते आणि तुम्हाला बरे वाटू लागते.

उकडलेली अंडी खा

अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात. यात विटॅमिन बी 6 आणि बी 12, झिंक आणि सेलेनियम असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताप असताना अंडी खाल्ल्याने अशक्तपणाही कमी होतो.

खिचडी हाही आहे चांगला पर्याय

ताप असताना आपले यकृत कमजोर होते ज्यामुळे जड अन्नपदार्थ पचवण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत खिचडी हा सोप्याने पचणारा आणि पौष्टिक पर्याय असतो.

रव्याचा उपमा देईल शक्ती

अंगात ताप असताना अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो ज्यामुळे अन्नावरची वासना उडते आणि अशक्तपणा येतो. अशावेळी आपल्या आहारात रव्याच्या उपम्याचा समावेश केल्यास आपली ही समस्या लवकर दूर होईल.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info